आजपासून जनगणनेला सुरुवात झालेली आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 1 मे ते 15 मे या कालावधीत स्व जनगणना होईल आणि 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणकामार्फत घरगणना होईल. भारत सरकारच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत स्व-गणना फॉर्म भरण्याची सुविधा सुरू झाली आहे.म्हणजेच जनगणणेमध्ये आपली अचूक माहिती घरी बसून आपली आपण भरू शकतो. आपल्या कुटुंबाची अचूक माहिती नोंदवण्यासाठी खालील प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करा...
🌐 अधिकृत वेबसाईट:
https://se.census.gov.in
📝 स्व-गणना प्रक्रिया (Step by Step)
1) पोर्टलवर लॉग-इन करा.
वेबसाईटला भेट देऊन आपले राज्य व आवश्यक माहिती निवडा.
2) कुटुंब नोंदणी करा.
कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी नोंदवा.
3) भाषा निवड व OTP पडताळणी.
आपली सोयीची भाषा निवडा आणि मोबाईलवर आलेला OTP टाका.
4) स्थान माहिती भरा.
जिल्हा, तालुका, गाव/शहर व स्थानिक माहिती अचूक भरा.
5) नकाशावर लोकेशन मार्क करा.
6) प्रश्नावली भरा.
कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती व्यवस्थित भरा.
7) Preview तपासा.
भरलेली माहिती पुन्हा तपासा आणि आवश्यक दुरुस्ती करा.
8) Final Submit करा.
एकदा सबमिट केल्यानंतर माहितीमध्ये बदल करता येणार नाही.
9) प्रगणक (Enumerator) भेट.
नंतर प्रगणक आपल्या घरी भेट देऊन पडताळणी करेल.
ही माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला SE ID (Self Enumeration ID) मिळेल
काही महत्वाच्या सूचना.
1) दिलेली माहिती अचूक व सत्य असणे आवश्यक आहे
2) नोंदणीनंतर मोबाईल नंबर बदलता येणार नाही
3) प्रत्येक कुटुंबासाठी वेगळा मोबाईल नंबर वापरा
"आजच आपली स्व-गणना पूर्ण करा आणि देशाच्या विकासात योगदान द्या."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा