शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

बदल्यांची कार्यवाही सुरू.....

महाराष्ट्र शासनाचा नवा शासननिर्णय.....

*🙏समजुन घ्या बदली धोरण..🙏*

🔴मुळसेवा 10 वर्ष पुर्णं असणारा प्रत्येक शिक्षक बदली पात्र....

🔴विशेष सुट 1 प्रमाणे बदली नको असल्यास घोषणापत्र द्यावे....

🔴विशेष सुट 2 प्रमाणे पती पत्नी 30कि.मी.बाहेर असतील तर 30मधील 20शाळा मागा.मनाप्रमाणे शाळा न मिळाल्यास उपलब्ध शाळा घ्यावी लागेल....
30च्या आत आहेत व बदलीपात्र यादीत नाव आहे तर 30च्या आतील ईतर 20विकल्प द्यावे लागतील...

🔴अवघड क्षेत्रात 3वर्ष सेवा असणारा परंतु मुळ सेवा 10वर्ष नसेल तरीही तो बदली मागु शकतो....अशावेळी त्याची बदली अनिवार्य नाही कारण मुळ सेवा 10पुर्णं नाही..20शाळेतुन त्याला शाळा न मिळाल्यास त्याला बदली नाकारता येईल...

🔴अवघड क्षेत्रात 3वर्ष सेवा व मुळसेवा 10वर्ष असणारा शिक्षक 20विकल्प मागेल...त्यातुन त्याला शाळा न मिळाल्यास उपलब्ध शाळा घ्यावीच लागेल....बदली अनिवार्य.

🔴सोपे क्षेत्रात मुळ सेवा 10असणारा प्रत्येक जण बदली पात्र....बदली पात्र यादीत नाव असेल तर (जिल्हा सेवा जेष्ठ)20विकल्प शाळा द्याव्या.शाळा न मिळाल्यास उपलब्ध पैकी शाळा घ्यावीच लागेल...बदली अनिवार्य.

🔴सोपे क्षेत्र मुळ सेवा 10वर्ष पुर्णं पण बदली पात्र यादीत नाव नाही...तो विनंती बदली मागु शकतो.20 विकल्प द्या.मनाप्रमाणे न मिळाल्यास उपलब्ध शाळा मागा.तरीही न मिळाल्यास बदली नाकारता येईल.पुर्वीप्रमाणे विनंती बदली.

🔴विनंती बदली सोपे क्षेत्र 10 वर्ष मुळ सेवा.

🔴विनंती बदली अवघड क्षेत्र 3वर्ष मुळ सेवा.

🔴अनिवार्य बदली सोपे क्षेत्र 10 वर्ष मुळसेवा पण बदली पात्र यादीत नाव असावे.

🔴अनिवार्य बदली अवघड क्षेत्र 10 वर्ष मुळ सेवा व 3वर्ष अवघड सेवा...

🔴तालुका ठिकाणापासुन ठरावीक अंतराबाहेरील शाळा अवघड तर आतील शाळा सोपे क्षेत्र...

🔴वरील प्रमाणेच पदवीधर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख बदल्या होतील...

🔴10वर्ष एकुण सेवा असणारा (सेवेत आल्या पासुन)प्रत्येक शिक्षक बदली पात्र...

*🔵बदल्यांचा क्रम...*

🔴विशेष शिक्षक 1बदल्या

🔴विशेष शिक्षक २ बदल्या

🔴अवघड क्षेत्र(अनिवार्य बदल्या)

🔴सोपे क्षेत्र(अनिवार्य बदल्या)

🔴शेवटी सोपे क्षेत्र विनंती बदल्या.

🔴बदली होणेसाठी बदली पात्र यादीत नाव असणे गरजेचे...

🔴नाव नसेल तर अवघड किंवा सोपे क्षेत्रातुन विनंती बदली मागु शकता...पण एकुण सेवा सोपे क्षेत्र 10 तर अवघड क्षेत्र 3वर्ष पुर्णं असावी.

🔴तालुका किंवा एका शाळेतील सेवेचा बदलीसाठी संबंध नाही..एकुण सेवा हाच निकष..

*प्रशासकीय बदलीचा धोका कोणाला?*
थोडक्यात.....
१. पहिल्या टप्प्यात मा. सीओं कडून कायमस्वरूपी ( बदली प्रकिया पूर्ण होईपर्यंत ) बहूशिक्षकी शाळेवर रिक्त ठेवायच्या पदात आपली शाळा आल्यास तेथील सिनीयर शिक्षकाला
२ ) दुसरा टप्पा विशेष संवर्ग -1 अंतर्गत मोडणाऱ्या शिक्षकाने आपली शाळा घेतल्यास त्यावरील सीनीअर शिक्षकाला
३ ) तिसरा टप्पा विशेष संवर्ग 2 अंतर्गत शिक्षकाने आपली शाळा घेतल्यास येथील सिनीअर
४ ) चौथा टप्पाअवघड क्षेत्रातील शिक्षकाने आपली शाळा घेतल्यास
५ )पाचवा टप्पा विनंती बदली आपल्यापेक्षा सिनिअर शिक्षकाने आपली शाळा घेतल्यास
पाच टप्प्याच्या चक्रव्यूहातून जो सुटला त्याची प्रशासकीय बदली टळली.

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.