गुरुवार, २२ मे, २०२५

नविन शैक्षणिक वर्षातील शालेय वेळापत्रक कसे आहे??

महाराष्ट्रातील शाळांचे जून 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक.
        महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्यात होते. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी, राज्य सरकार आणि शालेय शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शाळांचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, आणि शिक्षण पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. 
         या लेखात, जून 2025 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील शाळांचे वेळापत्रक, त्यातील बदल, आणि संबंधित महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा केली आहे.
1). शाळा सुरू होण्याचे नियोजन.
      महाराष्ट्रातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे:
1)- विदर्भ.
विदर्भातील अति उष्ण हवामानामुळे शाळा 23 जून 2025 पासून सुरू होतील. जर या तारखेला सार्वजनिक सुट्टी असेल, तर शाळा पुढील कार्यदिवशी सुरू होतील.
- विशेष बाब.
विदर्भातील शाळा सुरुवातीच्या काही दिवसांत केवळ सकाळच्या सत्रात (सकाळी 7:30 ते दुपारी 12:30) भरतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना दुपारच्या तीव्र उष्णतेचा त्रास होणार नाही.
2)- उर्वरित महाराष्ट्र.
राज्यातील इतर सर्व भागातील प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक शाळा 16 जून 2025 पासून सुरू होणार आहेत.
          हे वेळापत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एकसमानता राखली जाईल.
2). नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार वेळापत्रक.
        नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी महाराष्ट्रात जून 2025 पासून सुरू होत आहे. यामुळे शाळांचे वेळापत्रक आणि शिक्षण पद्धतीत खालील बदल अपेक्षित आहेत.
1). प्रत्यक्ष नविन वेळापत्रक.
- हे वेळापत्रक इयत्ता 1 ली साठी शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून अंमलात येतील.
- इयत्ता 2 री साठी हे नवीन वेळापत्रक पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होतील.
- शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून, राज्यातील सर्व शाळा सकाळी 9:00 वाजता सुरू होऊन सायंकाळी 4:35 वाजता संपतील.
- प्रत्यक्ष वेळ व तासिका पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे.
- वेळांचे टप्पे आणि तासिका.
1)9:00 ते 9:25.- शालेय परिपाठ. (25 मी.)
2)9:25 ते 10:00.-पहिली तासिका(35 मि.).
3)10:00 ते 10:35.-दुसरी तासिका(35 मि.)
4)10:35 ते 11:10-तिसरी तासिका(35 मि.)
5)11: 10 ते 12:45-चौथी तासिका(35 मि.)
6)12:45 ते 1:25- दीर्घ मध्यंतर (40 मि.)
7)1:25 ते 2:00- पाचवी तासिका (35 मि.)
8)2:00 ते 2:35- सहावी तासिका (35 मि.)  
9)2:35 ते 3:10- सातवी तासिका (35 मि.) 
10)3:10 ते 3:20- लघु मध्यंतर (10 मि.) 
11)3:20 ते 3:55- आठवी तासिका(35 मी.)
12)3:55 ते 4:30- नववी तासिका (35 मी.)
13)4:30 ते 4:35- वंदेमातरम आणि समारोप.
-हे वेळापत्रक विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक ताण कमी करून दर्जेदार शिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
- कार्यानुभव हा विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाईल.
- स्काऊट गाईड हा विषय यापुढे बनी या नावाने ओळखला जाईल.
- बनी हा विषय शाळेसाठी ऐच्छिक राहील.
2) तासिकांचे नियोजन.
- प्रत्येक तसिकेनंतर 5 मिनिटे पुढील तासिकेतील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
- राज्यातील शालेय कामकाजाचे एकूण 237 दिवस निश्चित करण्यात आले आहेत.
- शाळेतील अध्ययन अध्यापन ऐकून 210 दिवस चालेल.
- परीक्षा, मूल्यमापन व अनुषंगिक कार्य एकूण 14 दिवस चालेल.
- दप्तराविना शाळा, आनंददायी शनिवार व इतर सहशालेय उपक्रम एकूण 13 दिवस चालेल.

- वर्षभरातील तासिकांचे नियोजन पुढीलप्रमाणे.
1)-इयत्तानिहाय तासिका.
1) इ.3 ते 5 वी साठी एकूण 1872 तासिका.
2) इ.6 ते 8 वी साठी एकूण 1872 तासिका.
3) इ.9 ते 10वी साठी एकूण 1638 तासिका.
2)- विषयनिहाय तासिका.
1) प्रत्येक भाषेसाठी 234 तासिका राखीव.
2)गणित विषयासाठी 312 तासिका राखीव.
3)विज्ञान विषयासाठी 182 तासिका राखीव.
4)कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयासाठी एकूण 156 तासिका उपलब्ध.
3)- सप्ताहातील तासिका.
1) ग्रंथालयासाठी 1 तासिका राहील.
2) मराठी भाषा विषयासाठी 16 तासिका राहील.
3) इंग्रजी विषयासाठी 9 तासिका राहील.
4) गणित विषयासाठी 10 तासिका राहील.
5) कलाशिक्षण या विषयासाठी 6 तासिका राहील.
6) आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयासाठी 3 तासिका राहील.
7) कार्यशिक्षण या विषयासाठी 3 तासिका राहील.
8) सर्व विषय मिळून एका सप्ताहात एकूण 48 तासिका राहतील.
3). शनिवारी दप्तरमुक्त शाळा.
- नवीन शैक्षणिक धोरणानुसार, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा आयोजित केली जाईल. 
- या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि दप्तर आणण्याची गरज नसेल. 
- त्याऐवजी, कला, क्रीडा, संगीत, आणि मनोरंजनात्मक उपक्रमांवर भर दिला जाईल. 
- विविध कला, प्रश्नमंजुषा, खेळ व व्यावसायिक हस्तकला यांचा समावेश असलेल्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले जाईल.
4). अभ्यासक्रम आणि मूल्यमापन.
1)- नवीन अभ्यासक्रम.
- पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी जून 2025 पासून नवीन अभ्यासक्रम लागू होईल, 
- हा अभ्यासक्रम NCERT च्या धर्तीवर SCERT (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) ने तयार केला आहे. 
- हा अभ्यासक्रम कौशल्याधारित, मूल्यमापनाधिष्ठित, आणि समग्र विकासावर केंद्रित असेल.
2)- मूल्यमापन पद्धती.
- पारंपरिक सारांशात्मक मूल्यमापनाऐवजी नियमित आणि रचनात्मक मूल्यमापनावर भर दिला जाईल. 
- इयत्ता 3, 5, आणि 8 साठी शालेय परीक्षा घेतल्या जातील, 
- तर 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचे स्वरूप समग्र विकासाला प्रोत्साहन देणारे असेल.
3). शाळेच्या पहिल्या दिवसाचे नियोजन.
1)- 16 जून 2025.
- दरवर्षी राज्यातील  विदर्भ वगळता सर्व शाळा एकाच दिवशी उघडतील असे सरकारचे धोरण आहे.
- दरवर्षी 15 जून रोजी राज्यातील सर्व शाळा उघडतील असे सरकारचे धोरण आहे.
- 15 जून रोजी रविवार असल्याने यावर्षी शाळा 16 जून रोजी उघडतील.
2)- शालेय पाठ्यपुस्तक वाटप.
- शाळेच्या पहिल्या दिवशी, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातील. 
- यामुळे विद्यार्थी पहिल्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात करू शकतील.
3)- उपस्थिती सुनिश्चित करणे.
- शाळेच्या पहिल्या दिवशी 100% उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष निर्देश जारी केले आहेत. 
- यामुळे शालेय गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
4)- उद्घाटन कार्यक्रम.
बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी स्वागत समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि पालक-शिक्षक संवाद सत्र आयोजित केले जाईल.
5)- PM शक्ती पोषण आहार वाटप.
PM शक्ती पोषण योजनेअंतर्गत शालेय पोषण आहारात गोड पदार्थाचे वाटप करून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत होणार आहे.
6)- शालेय गणवेश वाटप.
- समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 'एक राज्य एक गणवेश' योजनेचा राज्यस्तरावरील कार्यवाही बाबतचा मागील राज्य शासनाचा निर्णय या राज्य सरकारने बदलून स्थानिक प्रशासन व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत कार्यवाही करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
- त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश मिळणार आहेत.
7)- पहिले पाऊल उपक्रम.
इयत्ता पहिलीसाठी प्रवेशपपात्र नवागत मुलांचे वेगवेगळ्या उपक्रमाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वागत होणार आहे.
4).सुट्ट्यांचे वेळापत्रक.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये खालील प्रमुख सुट्ट्या असतील:
1)- उन्हाळी सुट्टी. - 2 मे 2025 ते 14 जून 2025 (विदर्भात 23 जून 2025 पर्यंत).
2) - प्रथम सत्र.- 16 जून 2025 ते 16 ऑक्टोबर 2025
2)- दिवाळी सुट्टी. - 17 ऑक्टोबर 2025 ते 1 नोव्हेंबर 2025.(16 दिवस)
3)- द्वितीय सत्र. - 3 नोव्हेंबर 2025 ते 1 मे 2026.
3)- नाताळ सुट्टी.- 25 डिसेंबर 2025 च्या आसपास 1-5 दिवस.(स्थानिक व्यवस्थापनानुसार)
4)- सार्वजनिक सुट्ट्या. 
1) 7 जून -2025 - बकरी ईद.
2) 14 ऑगस्ट - 2025 - पतेती.
3) 15 ऑगस्ट- 2025- स्वातंत्र्य दिन.
4)  27 ऑगस्ट -2025- गणेश चतुर्थी.
4) 5 सप्टेंबर- 2025- ईद ए मिलाद.
5) 2 ऑक्टोबर- 2025- गांधी जयंती व दसरा.
6) 5 नोव्हेंबर -2025- गुरुनानक जयंती.
7) 25 डिसेंबर - 2025- नाताळ.
8) 26 जानेवारी - 2026- प्रजासत्ताक दिन.
9) 19 फेब्रुवारी - 2026 - छ.शिवाजी महाराज जयंती.
10) 3 मार्च -2026- धुलीवंदन.
11)19 मार्च - 2026- गुढीपाडवा.
12) 26 मार्च - 2026- रामनवमी.
13) 31 मार्च - 2026- महावीर जयंती.
14) 3 एप्रिल - 2026- गुड फ्रायडे.
15) 14 एप्रिल - 2026- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती.
16) 1 मे - 2026- महाराष्ट्र दिन.
5) स्थानिक सुट्ट्या.
- सार्वजनिक सुट्ट्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील धार्मिक किंवा स्थानिक लोकप्रिय सणानिमित्त तीन सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार मा.जिल्हाधिकारी यांना असतात. 
- सन 2025 मधील मा.जिल्हाधिकारी यांनी जालना जिल्ह्यासाठी खालील तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत.
1) 8 जानेवारी - 2025 - राजाबाग दर्गा उत्सव, जालना.
2) 29 सप्टेंबर - 2025- मात्सोदरी देवी नवरात्र उत्सव, अंबड.
3) 20 ऑक्टोबर - 2025 - नरक चतुर्दशी.
6) इतर सुट्ट्या.
- रविवारच्या एकूण 52 दिवस सुट्ट्या राहतील.
- वर्षभरातील इतर एकूण सुट्ट्या 76 दिवस राहतील.
- वर्षभरातील रविवार व इतर सुट्ट्या मिळून एकूण सुट्ट्या 128 दिवस राहतील.
- याशिवाय जन्माष्टमी, अनंत चतुर्थी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, पोळा, घटस्थापना,  गौरीपूजन व मकरसंक्रांत यांसारख्या सणांसाठी तीन सुट्ट्यांसाठी मुख्याध्यापक यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने आणि स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने सुट्ट्यांचे नियोजन केले जाऊ शकते.
- सुट्ट्यांचा एकूण कालावधी 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
5). विशेष उपाययोजना.
1)- विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करणे. 
नवीन वेळापत्रक आणि दप्तरमुक्त शनिवार यामुळे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबाव कमी होईल.
2)- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा.
NEP 2020 अंतर्गत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण, सहाय्यक उपकरणे, आणि तंत्रज्ञान-आधारित साधने उपलब्ध करून दिली जातील.
3)- RTE 25% प्रवेश.
2025-26 शैक्षणिक वर्षासाठी RTE अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जून 2025 मध्ये काढली जाईल, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळेल.
6). पालक आणि शिक्षकांसाठी सूचना.
1)- पालकांसाठी.
- प्रवेशपात्र मुलांचे जवळच्या शाळेत दाखल करून पटनोंदणी शाळा सुरु होण्याअगोदर करून घ्यावी.
- शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी.
 - नवीन वेळापत्रकानुसार मुलांचे दैनंदिन वेळापत्रक तयार करावे.
 - शाळेच्या सूचना आणि परिपत्रकांवर लक्ष ठेवा.
- शाळा सुरू होण्यापूर्वी मुलांना शाळेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे.
2)- शिक्षकांसाठी.
  - नवीन अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीबाबत अभ्यास करावा व प्रशिक्षण घ्यावे.
  - विद्यार्थ्यांच्या समग्र विकासासाठी क्रीडा, कला, आणि सहशालेय उपक्रमांना प्रोत्साहन द्या.
  - शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वितरण आणि विद्यार्थी स्वागताची तयारी करा.
- शालेय पोषण योजनेअंतर्गत गोड पदार्थाचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करावे.
-नवीन प्रवेशित मुलांचे स्वागत करण्यासाठी 'पहिले पाऊल' उपक्रम राबवावा.
         महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात जून 2025 पासून नवीन शैक्षणिक धोरणासह एक नवीन अध्याय सुरू करेल. नवीन वेळापत्रक, दप्तरमुक्त शनिवार, आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम यामुळे विद्यार्थ्यांना अधिक समग्र आणि तणावमुक्त शिक्षण मिळेल. विदर्भातील विशेष व्यवस्था आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण व स्वागत समारंभ यासारख्या उपाययोजना शिक्षणाच्या समान संधींना प्रोत्साहन देतील. पालक, शिक्षक, आणि विद्यार्थ्यांनी या बदलांचा स्वीकार करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज व्हावे.सर्व विद्यार्थी, शिक्षक,पालक व शिक्षण प्रेमी नागरिक यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.