विचार करूनबदली अर्ज करा .....
जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये २०१९ च्या बदल्यासाठी बदलीचे पोर्टल चालु झाले आहे . जिल्हांतर्गत जिल्हांतर्गत बदली अर्ज करत आसताना शिक्षकबांधव अनेक संभ्रमावस्थाना समोर जाताना दिसत आहेत .ज्या संभ्रमावस्था निर्माण झालेल्या आहेत त्या विषयी थोडेसे लिहित आहे . याचा आपणास नक्कीच फायदा होइल .
१) बदलीपात्र शिक्षक याद्या
२) क्लिअर व्हॅकंसी (रिक्त पदाच्या ) याद्या
३)कंपलसरी व्हॅकंसी (समानिकरण पदाच्या) याद्या
१) बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या : या यादीमध्ये ज्या शिक्षकांची नावे आलेली आसतात त्या शिक्षकाना एका क्षेत्रामध्ये सलग सेवेची १० वर्ष आणि सध्याच्या शाळेमध्ये ०३ वर्ष पुर्ण झालेली आसतात .अशा शिक्षकांची नावे या यादीमध्ये येत आसतात .
२) क्लिअर व्हॅकंसी ( रिक्त पदाच्या जागा) : या यादीमध्ये त्या शाळेच्या समोर ज्या पदाच्या जेवढ्या जागा त्या शाळेमध्ये सध्या रिक्त आहेत तितक्या पदांची संख्या येथे दर्शविलेली आसते. UGT , GT , HM या पदाखाली जितकी संख्या दर्शविलेली आसते तितकी पदे निव्वळ रिक्त आसतात
३) कंपलसरी व्हॅकंसी (समानिकरण पदे) : शाळेच्या समोर पदांच्या समोर जितकी पदे दर्शविलेली आसतात ती समानिकरणामध्ये ठेवलेली पदे आसतात . म्हणजे ज्या पदाची जितकी पदे समानिकरणामधुर दर्शविलेली पदे आसतात तितकी पदे या बदलीमध्ये रिक्त ठेवावयाची आसतात. म्हणजे त्या पदाची तितकी पदे भरली जात नाहीत . आपण बदली अर्ज करताना या या बाबीचा विचार करावा.
बदली अर्ज करत आसताना ....
संवर्ग ०१ ....
शासननिर्णय दिनांक २७/०२/२०१७ , २१/०२/२०१९, २८/०५/२०१९ मधील संवर्ग ०१ साठी ज्या अटी व नियम दिलेले आहेत आणि हे नियम व अटी ज्याना लागु होत आहेत आसे शिक्षक संवर्ग ०१ मध्ये येत आसतात . ०८/०३/२०१९ च्या शासननिर्णयानुसार ज्या शिक्षकाना एका क्षेत्रातील सलग सेवेची १० वर्ष आणि सध्याच्या शाळेत ०३ वर्ष पुर्ण करणारे शिक्षक बदलीपात्र आसतात आसे सर्व शिक्षक बदलीपात्र आसतात. या बदलीपात्र यादीमध्ये येणार्या शिक्षकानी बदलीसाठी अर्ज करावा किंवा बदलीस नकार द्यावा अन्यथा याना खो बसु शकतो.
संवर्ग ०१ मध्ये बदलीपात्र नसलेल्या शिक्षकाला जर बदली हवी आसेल तर ते सुद्धा संवर्ग ०१ मधुन बदलीसाठी अर्ज करु शकतात कारण शासननिर्णय २१/०२/२०१९ च्या तरतुदीनुसार बदलीपात्र नसलेल्या संवर्ग ०१ मध्ये येणार्या शिक्षकाना सेवेची अट नाही म्हणुन संवर्ग ०१ मध्ये बदलीपात्र नसताना सुद्धा बदली हवी आसल्यास बदलीसाठी अर्ज करु शकतात .
संवर्ग ०१ मधील शिक्षक हे बदली अर्ज करत आसताना बदलीपात्र कोणत्याही शिक्षकाची जागा मागु शकतात व क्लिअर व्हॅकंसीची जागा सुद्धा मागु शकतात.
बदलीपात्र आसलेल्या किंवा बदलीपात्र नसलेल्या संवर्ग ०१ मध्ये येणार्या शिक्षकाने बदलीसाठी अर्ज केला आणि त्याना जर बदलीने शाळा मिळाली नाही तर ते पुर्वीच्याच शाळेत कार्यरत राहतात ते विस्थापित होत नाहीत .
संवर्ग ०१ मधील २०१८ च्या बदलीमध्ये ज्यां शिक्षकांची बदली झाली आहे परंतु त्याना यावर्षी सुद्धा बदली हवे आसेल तर ते बदलीसाठी अर्ज करु शकतात आणि बदली करावयाची नसेल तर त्यानी नकाराचा अर्ज भरावयाची आवश्यकता नाही . कारण ते बदलीपात्र नसल्यामुळे त्याना कोणीही खो देवु शकत नाहीत . बदलीपात्र संवर्ग ०१ मध्ये ज्यानी २०१८ च्या बदलीमध्ये नकार देवुन सुट घेतली होती आणि सध्या ते बदलीपात्र आसतील व त्याना बदली हवी आसल्यास बदलीसाठी अर्ज करु शकतात किंवा त्यानी नकार देणे बंधनकारक आहे . नाहीतर कोणीही खो देवु शकतो . बदलीपात्र नससाल तर नकार किंवा कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. बदली पोर्टलला सर्वांचीच नावे दिसतात त्यामुळे कोणीही घाबरु नये हि विनंती .
संवर्ग ०२
शसननिर्णय २७/०२/२०१७ , २१/०२/२०१९ व २८/०५/२०१९ च्या शासननिर्णयातील समाविष्ट केलेल्या (अं) नियमामध्ये येणारे पती पत्नी सेवेचे नियम व अटी पुर्ण करतात आणि त्यांच्या सध्याच्या कार्यालयातील अंतर ३० किमी पेक्षा जास्त आहे आसे शिक्षक संवर्ग ०२ मध्ये अर्ज करु शकतात . दोघेही ३० किमीच्या आत कार्यरत आसलेले शिक्षक संवर्ग ०२ मध्ये येत नाहीत.
संवर्ग ०२ मध्ये येणार्या कर्मचारी यांच्या दोन विभागण्या झालेल्या आहेत . १) एकाच जिल्ह्यातील एक जि प प्राथमिक शाळेतील शिक्षक तर दुसरा इतर विभागातील कर्मचारी अशी पती पत्नी जोडी ( मग तो जि प शाळेतील माध्यमिक शिक्षक/ केप्र , शिविअ/ ही आसु आसतो )
२)एकाच जिल्ह्यातील जि प प्राथमिक शाळेत आसलेले पती पत्नी शिक्षकाची जोडी
संवर्ग ०२ मध्ये आशी विभागणी झालेली आहे . वरील ०१ मध्ये येणार्या कार्यरत आसलेल्या जि प शिक्षक व इतर विभागातील जोडीदार कर्मचारी या पती पत्नीच्या कार्यालयातील अंतर ३० किमी पेक्षा जास्त आसल्यास तो जि प शिक्षक बदलीसाठी अर्ज करौ शकतो . त्याला १०/०३ सेवेची अट नाही . संवर्ग ०२ मधील १ विभागात येणारा शिक्षक बदलीपात्र आसेल आणि त्याला संवर्ग २ मधुन अर्ज करुन केल्यानंतर बदलीने गाव शाळा मिळाली नसेल आणि त्याला जर वरिष्ठ शिक्षकामे खो दिला तर विस्थापित होत आसतो . परंतु संवर्ग २ मधील बदलीपात्र नसलेल्या शिक्षकाने संवर्ग ०२ मधुन अर्ज केला आणि बदलीने शाळा मिळाली नसेल तर त्याला कोणीही खो देवु शकत नाही आणि विस्थापितही होवु शकत नाही कारण तो बदलीपात्र नाही .संवर्ग ०२ मध्ये बदलीसाठी अर्ज करताना आपण बदलीपात्र आसलेल्या आपल्यापेक्षा सेवाज्येष्ठ, सेवा कनिष्ठ शिक्षकांचेर जागा व क्लिअर व्हॅकंसी मधील जागा मागु शकतो
संवर्ग ०२ मधील विभाग ०२ मध्ये येणारे पतीपत्नी शिक्षक .
यामध्ये दोघेही जि प प्राथमिक शिक्षक आसतात आणि यांच्या कार्यालयातील अंतर हा ३० किमी पेक्षा जास्त आसतो
जि प शाळेत कार्यरत आसलेले पतीपत्नी जोडी ३० किमी पेक्षा जास्त अंतरावर आसल्यानंतर बदली हवी आसताना २८/०५/२०१९ चा शासननिर्णय आवश्य वाचावा हि विनंती .
त्यामध्ये संवर्ग ०२ चा लाभ घेण्याकरिता खालील नियम देण्यात आले आहेत.
विशेष संवर्ग ०२ साठी पात्र आसणारे शिक्षक हे दोन्ही एकाच जिल्हा परिषदेचे शिक्षक आसल्यास .अर्ज कोणी करावा याविषयी खालील बाब लक्षात घ्यावी
अ) पती पत्नी या दोघापैकी एकही शिक्षक बदलीपात्र शिक्षक नसल्यास अथवा दोघेही बदलीपात्र शिक्षक आसल्यास ज्या शिक्षकाचा सेवाकालावधी तो कार्यरत आसलेल्या शाळेत जास्त झाला आसेल अशा शिक्षकानेच पती पत्नी एकत्रीकरणांतर्गत अर्ज करावा . पती पत्नी यांचा सेवा कालवधी सारखा आसल्यास , त्या दोघापैकी इछुक आसेल अशा एकानेच बदली अर्ज सादर करावा
ब) पती पत्नी या दोघापैकी एकच शिक्षक बदलीपात्र आसल्यास , जो शिक्षक बदलीपात्र आहे त्याच शिक्षकाने पती पत्नी एकत्रीकरणांतर्गत अर्ज करावा
आता लक्षात घ्याकी आपण जर बदलीपात्र शिक्षक आससाल आणि संवर्ग २ मध्ये अर्ज करत आससाल आणि अर्ज करुनही आपणास शाळा मिळाली नसेल तर आपण विस्थापित व्हाल आणि आपणास समुपदेशनाने ३० किमी मध्ये किंवा ३० कीमी च्या लगत च्या शाळेत पदस्थापना देण्याचा प्रयत्न मा मु का अ देण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी विस्थापित झाल्याबरोबर जि प ला अर्ज करावा.
दुसरी बाब लक्षात घ्या की आपण जर बदलीपात्र नससाल आणि आपण दिलेल्या २० शाळापैकी शाळा मिळाली नसेल तर आपण विस्थापित होत नाहीत कारण आपण बदलीपात्र नाहीत . म्हणजे मुळ शाळेवरच कार्यरत रहाल . जर आपणास बदलीने शाळा मिळाली नसेल तर आपण मा मुकाअ यांच्याकडे समुपदेशनासाठी अर्ज करु शकता . समुपदेशनाने ३० किमी मध्ये किंवा ३० कीमी च्या लगत च्या शाळेत पदस्थापना देण्याचा प्रयत्न मा मुकाअ देण्याचा प्रयत्न करतील. संवर्ग ०२ मध्ये अर्ज करताना आपण बदलीपात्र शिक्षकापैकी सेवाज्येष्ठ शिक्षक , सेवाकनिस्ठ शिक्षक व क्लिअर व्हॅकंसीच्या शाळा आपल्या पसंतीक्रमामध्ये देवु शकता पन त्या शाळा जोडीदाराच्या शाळेपासुन ३० कीमी च्या आत आसल्या पाहिजेत.
संवर्ग ०३
जिल्हा परिषदेने ज्या शाळा दुर्गम भागातल्या शाळा म्हणुन घोषित केलल्या आहेत त्या शाळेमध्ये सध्या कार्यरत आसलेले सर्व शिक्षक व महिलांसाठी अतिदुर्गम म्हणुन घोषित केलेल्या शाळेतील महिला शिक्षक संवर्ग ०३ मध्ये येत आसतात
दुर्गम शाळेत सध्या कार्यरत असलेले शिक्षक (महिला/पुरुष दोघेही ) ज्याना दुर्गम भागातील १० वर्ष पुर्ण होत आसतात ते बदलीपात्र शिक्षक म्हणुन घोषित होत आसतात व यांची जागा बदलीपात्र सेवाज्येष्ठ शिक्षक मागु शकतो . दुर्गम शाळेत ०३ वर्ष पुर्ण झाले आहेत आसे सर्व शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणुन घोषित होत आसतात व ते बदलीपात्र नसले तरी बदली अधिकार प्राप्त आसल्यामुळे बदलीसाठी अर्ज करु शकतात . त्याना जर पसंतीक्रमातील शाळा मिळाली नसेल तर ते विस्थापित होत नसतात व ते त्याच मुळ शाळेत कार्यरत राहतात . महिलांसठी दुर्गम घोषित केलेल्या शाळेतील (Unfit for ladies) महिला बदलीसाठी अर्ज करु शकतात जर याना बदलीने पसंतीक्रमातील शाळा मिळाली नाहीतर ते विस्थापित होत नसतात ते त्याच शाळेत कार्यरत आसतात
दुर्गम व अतिदुर्गम शाळेत आसणारे व बदलीसाठी अर्ज करणारे शिक्षक व महिला हे अर्ज करताना बदलीपात्र शिक्षकापैकी आपल्यापेक्षा सेवाज्येष्ठ शिक्षक , सेवा कनिष्ठ शिक्षक व क्लिअर व्हॅकंसीच्या शाळा निवडु शकतात
दुर्गम क्षेत्रातील व अतिदुर्गम भागात काम करणारे शिक्षक जर संवर्ग ०१ , ०२ मध्ये येत आसतील तर ते संवर्ग ०१ व ०२ मध्ये सुद्धा अर्ज करु शकतात .दुर्गममधील बदलीपात्र नसलेले शिक्षकाने संवर्ग ०१,०२ मध्ये बदलीसाठी अर्ज केला आणि पसंतीक्रमातील शाळा मिळाली नाही तर ते विस्थापित होत नाहीत . ते त्याच शाळेत कार्यरत आसतात
संवर्ग ०४
संवर्ग १,२,३ मधील सर्व शिक्षक सोडुन बाकी सर्व शिक्षक संवर्ग ०४ येतात . त्यामध्ये ३० किमीच्या आत कार्यरत आसणारे जिल्हा परिषद शाळेतील पतीपत्नी सुद्धा संवर्ग ०४ मध्ये येत आसतात.
२७/०२/२०१७ च्या शासननिर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पतीपत्नी शिक्षक यांच्या दोघाच्या शाळेतील अंतर ३० किमीपेक्षा कमी आसेल तर जि प प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक संवर्ग ०४ मध्ये येत आसतात व बाकी संवर्ग ०१,०२,०३ सोडुन इतर एकल शिक्षक सुद्धा संवर्ग ०४ मध्ये येत आसतात .
संवर्ग ०४ मधील एकल शिक्षकाने अर्ज करताना बदलीपात्र आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा , क्लिअर व्हॅकंसीच्या शाळाच निवडाव्यात याउपर आपण जास्तच जुनिअर आससाल आणि आपणास २० शाळा निवडताना काही शाळा कमी पडत आसतील तर आपणास माहित आसलेल्या संवर्ग ०१,०२,०३ मध्ये बदली करुन जाणार्या शाळा निवडाव्यात . मग ते आपल्यापेक्षा सिनिअर आसले तरी व ज्युनिअर असले तरी ते बदलीने जाणार आहेत म्हणुन त्यांच्या शाळा निवडण्याची रिस्क घेवु शकता कारण आपणास शाळाच कमी मिळत आसतील तर पर्याय तरी काय राहणार आहे*हि रिस्क आपल्या मनावर आहे
संवर्ग ०४ मधील पती-पत्नी
जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक पदावर ३० किमीच्या आत कार्यरत आसलेले पती पत्नी संवर्ग ०४ मध्ये येत आसतात . जोडीदार जर इतर विभागात कार्यरत आसेल तर ते संवर्ग ०४ मध्ये येत नसतात
२०१८ च्या बदलीमध्ये जे शिक्षक पती पत्नी संवर्ग ०२ मधुन बदलीने आले आहेत त्यापैकी दोघेही जर बदलीपात्र नसतील तर यावर्षी कोणीही अर्ज करण्याची आवश्यकता नाही किंवा मे २०१८ मध्ये बदली झाली नाही परंतु ते दोघेही बदलीपात्र नसतील तरी बदली अर्ज करण्याची आवश्यकता नाही . मे २०१८ मध्ये बदली झालेल्यापैकी एक बदलीपात्र आहे नविन यावर्षी दोघापैकी एक किंवा दोघेही बदलीपात्र आससाल व संवर्ग ०४ मधुन बदलीसाठी पतीपत्नी ला ३० किमीच्या आत शाळा पाहिजे आसल्यास दोघानीही एक युनिट मध्ये अर्ज करावा म्हणजे दोघांचीही ३० किमी आतमध्ये बदली करण्याचा संगणक प्रयत्न करील जर ३० किमीच्या आत मिळाले नाही तर मा मुकाअ यांच्याकडे ३० किमी च्या आतली शाळा देण्यासाठी समुपदेशनाचा अर्ज द्यावा
मे २०१८ मध्ये ज्या जोडीदाराची बदली झाली आहे तो बदलीपात्र नाही म्हणुन जो जोडीदार बदलीपात्र आहे त्याने आपल्या जोडीदाराचा स्टाफ आयडी टाकुन बदलीसाठी अर्ज करावा. शाळांचा पसंतीक्रम निवडताना बदलीपात्र शिक्षकापैकी आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षक , क्लिअर व्हॅकंसी व संभाव्य संवर्ग ०१,०२,०३ मध्ये बदलीने जाणार्या शिक्षकांच्या शाळा निवडाव्यात
संवर्ग ०१,३ व ३ मधील महिलांसाठी प्रतिकुल घोषित केलेल्या शाळेतील महिला शिक्षिका बदली अर्जामध्ये शाळांचा पसंतीक्रम निवडताना बदलीपात्र शिक्षकांच्या कोणत्याही जागा व क्लिअर व्हॅनक्सी मधील जागा मागु शकतात . संवर्ग ०२ मधिल शिक्षक शाळा निवडताना आपल्या जोडीदाच्या शाळेपासुन / कार्यालयापासुन ३० किमीच्या आतील कोणत्याही बदलीपात्र शिक्षकांच्या व क्लिअर व्हॅकंसीच्या शाळा निवडु शकतील. संवर्ग ०४ मधील शिक्षक शाळा निवडताना बदलीपात्र शिक्षकापैकी आपल्यापेक्षा कनिष्ठ शिक्षकांच्या शाळा , क्लिअर व्हॅकंसी च्या शाळा निवडु शकतात . संवर्ग ०१ ते ४ मधील संभाव्य बदलीकतुन जाणर्या ०१ ते ०४ मधील बदलीकतुन जाणर्या शिक्षकांच्या जागा सुद्धा निवडु शकतात . तो एक जॅकपॉट ठरेल कारण त्यांची बदली होइलच माहित नसते पन कर झाली तर संवर्ग व सेवाज्येष्ठता लक्षात घेता आपणासही मिळु शकते
क्लिअर व्हॅकंसी निवडत आसताना ज्या पदाची जितकी पदे क्लिअर व्हॅकंसी मध्ये आहेत त्याच पदाची तितकीच पदे कंपलसरी व्हॅकंसी मध्ये दिसत आसतील तर ती शाळा पसंतीक्रमामध्ये निवडु नये
बदलीपोर्टल वर बदली फॉर्म भरताना सर्वच शाळा दिसतात त्यामुळे हे आवश्यल आहे . बदलीपात्र शिक्षकांची यादी क्लिअर व्हॅकंसी यादी व कंपलसरी व्हॅकंसी च्या याद्या आपल्याजवळ ठेवाव्यात किंवा अभ्यास करुन शाळांचा पसंतीक्रम निवडावा
बदली पोर्टलवर सर्व शिक्षकांची नावे दिसत आहेत म्हणुन कोणीही घाबरु नये आपण जर बदलीपात्र नससाल तर आपणास कोणीही खो देणार नाही ही बाब लक्षात घ्यावी .
२०१९ मधील बदलीमध्ये जर आपाणास बदलीमध्ये शाळा मिळाली नाही आणि आपणास विस्थापित होण्याची वेळ आलीच तर समुपदेशनाने आपणास शाळा मिळणार आहे .