विशेष संवर्ग शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील आवश्यक पुराव्यांची माहिती.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या बदल्यांची कार्यवाही चालू आहे. यामध्ये विशेष संवर्ग शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा समावेश आहे.
विशेष संवर्ग शिक्षकाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे, नियम, आणि प्रक्रिया निश्चित केली आहेत. ही प्रक्रिया शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, आणि वैद्यकीय गरजांनुसार योग्य ठिकाणी बदली मिळवून देण्यासाठी राबवली जाते.
यामध्ये विशेष संवर्ग शिक्षक म्हणून लाभ घेण्यासाठी लागणारे आवश्यक पुरावे, प्रमाणपत्रे, नियम, आणि प्रक्रियेचे तपशील याबाबत माहिती जाणून घेऊ.
1) विशेष संवर्ग शिक्षकांचे प्रकार.
विशेष संवर्ग शिक्षकांना दोन मुख्य भागांमध्ये वर्गीकृत केले आहे.यामध्ये विशेष परिस्थिती असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. यात खालील श्रेणी येतात.
विशेष संवर्ग भाग-1.
- पक्षाघाताने आजारी शिक्षक
- दिव्यांग शिक्षक / कुटुंबातील दिव्यांग व्यक्ती
- विधवा शिक्षिका.
- कुमारिका /अविवाहित शिक्षिका.
- परित्यक्ता/घटस्फोटीत शिक्षिका.
- स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब.
- आजी/माजी सैनिकाचे कुटुंब.
- स्वतः/कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असलेले शिक्षक.
- वयाची 53 वर्षे पूर्ण केलेली शिक्षक.
विशेष संवर्ग भाग 2.
- पती-पत्नी एकत्रीकरण.
- जर पती पत्नी 30km पेक्षा जास्त अंतरावरील शाळा/कार्यालयात कार्यरत असलेले शिक्षक/कर्मचारी.
2) बदलीसाठी आवश्यक पुरावे आणि प्रमाणपत्रे.
बदलीसाठी शिक्षकांना विशिष्ट कागदपत्रे आणि पुरावे सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक श्रेणी अंतर्गत आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
1)विशेष संवर्ग भाग-1.
1) पक्षाघाताने आजारी शिक्षक.
पक्षाघातामुळे शिक्षकांना वैद्यकीय सुविधांजवळ किंवा सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी हा लाभ दिला जातो.
- आवश्यक कागदपत्रे.
- कार्यरत प्रमाणपत्र (शिक्षक सध्या सेवेत असल्याचा पुरावा)
- वैद्यकीय उपचार पेपर असलेली संचिका (पक्षाघाताच्या उपचारांचे दस्तऐवज)
- सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जे पक्षाघाताच्या आजाराची पुष्टी करते.
- जिल्हा शल्य चिकित्सकाचे प्रमाणपत्र. (पक्षाघाताची पुष्टी)
- विशेष शिक्षक संवर्ग भाग-1 साठी विंनती अर्ज.
2) दिव्यांग शिक्षक.
-दिव्यांग व्यक्तींच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य ठिकाणी बदली मिळावी.
- यामध्ये स्वतः दिव्यांग शिक्षक/ त्यांच्या दिव्यांग मुलांचे पालक/ ज्यांच्या पालकांपैकी एक दिव्यांग आहे असे शिक्षक समाविष्ट आहेत.
- आवश्यक कागदपत्रे:
- विशेष शिक्षक संवर्ग भाग-1 साठी विंनती अर्ज.
- पालकत्व प्रमाणपत्र/ पती पत्नी असल्याचे प्रमाणपत्र.
- स्वतःचे/पत्नीचे/मुलाचे मानसिक विकलंगतेचे/दिव्यांग प्रमाणपत्र/ ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र.
- कार्यरत प्रमाणपत्र
- स्वतःच्या, मुलांच्या, किंवा पालकांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकरणाकडून)
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षण प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
3) विधवा शिक्षिका.
विधवा शिक्षिकांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी सोयीच्या ठिकाणी बदली मिळवून दिल्या जाते.
- आवश्यक कागदपत्रे:
- कार्यरत प्रमाणपत्र
- पतीचे मृत्यूप्रमाणपत्र
- पती-पत्नी अवलंबित्वाचा पुरावा (उदा., विवाह प्रमाणपत्र)
- विशेष शिक्षक संवर्ग भाग-1 साठी विंनती अर्ज.
4) कुमारिका/अविवाहित शिक्षिका.
अविवाहित महिला शिक्षकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी योग्य ठिकाणी बदलीची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते.
- आवश्यक कागदपत्रे.
- कार्यरत प्रमाणपत्र
- कुमारिका असल्याचा पुरावा (उदा., शपथपत्र किंवा संबंधित प्रमाणपत्र)
- विशेष शिक्षक संवर्ग भाग-1 साठी विंनती अर्ज.
परित्यक्ता शिक्षिकांना स्वतंत्रपणे जीवन जगण्यासाठी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी बदली सोईच्या ठिकाणी बदली कण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
- आवश्यक कागदपत्रे.
- कार्यरत प्रमाणपत्र
- परित्यक्ता असल्याचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन याचिका
- आपले सरकार पोर्टलवरून प्राप्त प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- घटस्फोटाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- विशेष शिक्षक संवर्ग भाग-1 साठी विंनती अर्ज.
6) स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब.
स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील मुलगा/मुलगी/नातू/नात यांना विशेष सवलत म्हणून बदली मिळवून दिली जाते.
- आवश्यक कागदपत्रे.
- विशेष शिक्षक संवर्ग भाग-1 साठी विंनती अर्ज
- कार्यरत प्रमाणपत्र.
- माजी सैनिक सेवानिवृत्त प्रमाणपत्र.
- स्वातंत्र्य सैनिक हयात असल्याचे प्रमाणपत्र
- कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध प्रमाणपत्र (मुलगा, मुलगी, पत्नी, नातू/नात)
- स्वातंत्र्य सैनिक हयात असल्याचे प्रमाणपत्र.
7) गंभीर आजारी शिक्षक/पती/पत्नी/मुलगा/मुलगी.
गंभीर आजारी शिक्षकांना कुटुंबातील आजारी सदस्यांना वैद्यकीय सुविधांजवळ आणि कौटुंबिक आधार मिळेल अशा ठिकाणी बदलीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.गंभीर आजार पुढील प्रमाणे.
- स्वतः/पती/पत्नीचे हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक.
- स्वतः/पती/पत्नीचे एकच मूत्रपिंड असलेले/मूत्रपिंड रोपण केलेले/डायलेसिसवर असलेले शिक्षक.
- स्वतः/पती/पत्नीचे यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
- स्वतः/पती/पत्नी/आई/वडील कॅन्सरने आजारी असलेले शिक्षक.
- स्वतः/पती/पत्नीला मेंदूचा आजार असलेले शिक्षक.
- स्वतः/पती/पत्नीला थेलेसिमिया/जन्मजात गुणसूत्राचा आजार असलेले शिक्षक.
- आवश्यक कागदपत्रे.
- कार्यरत प्रमाणपत्र
- वैद्यकीय उपचार पेपर असलेली संचिका
- सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
- जिला शस्त्रचिकित्सकांचे प्रमाणपत्र
- पती-पत्नी एकत्र असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
- विशेष शिक्षक संवर्ग भाग-1 साठी विंनती अर्ज.
8) वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक.
सेवाज्येष्ट शिक्षकांना उतारवयात सोयीची शाळा उपलब्ध करून दिल्या जाते. त्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षक उतारवयात अधिक कायक्षमपणे अध्यापनाचे कार्य करू शकेल.
- आवश्यक कागदपत्रे.
- विशेष संवर्ग भाग 1 चा लाभ घेण्याबाबत अर्ज.
- कार्यरत प्रमाणपत्र.
- सेवापुस्तिकेचे पहिले पान.
- या ssc सनद/tc.
9) आजी/माजी सैनिक/अर्धसैनिक जवानाचा पत्नी/विधवा.
आवश्यक कागदपत्रे.
- कार्यरत प्रमाणपत्र.
- माजी सैनिक सेवानिवृत्त प्रमाणपत्र/आजी सैनिक कार्यरत प्रमाणपत्र.
- पती पत्नी असल्याचा पुरावा.
- विशेष संवर्ग 1 साठी अर्ज.
2)विशेष संवर्ग भाग 2.
पती-पत्नी एकत्रीकरण.
- कौटुंबिक एकता राखण्यासाठी 30km पेक्षा जास्त अंतरावरील कार्यरत पती-पत्नीला एकाच ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
- पती-पत्नी दोघांपैकी एक जिला परिषद शिक्षक आणि दुसरा ग्रामविकास/पंचायतराज कर्मचारी असल्यास,खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील अथवा संस्थेतील कर्मचारी असल्यास बदलीसाठी एकाच शाळेत किंवा 30 km परिसरात बदली करण्याची विशेष तरतूद आहे.
लाभार्थीचे निकष.
- पती, पत्नी दोघेही जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील तर.
- जर पती-पत्नीपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा राज्य शासनाचा कर्मचारी असेल तर.
- जर पती-पत्नीपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा केंद्र शासनाचा कर्मचारी असेल तर.
- जर पती-पत्नीपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा राज्य शासनाचा स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर.
- जर पती-पत्नीपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा राज्य/केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल तर.
- जर पती-पत्नीपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक आणि दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक/ कर्मचारी असेल तर.
- जर पती पत्नीपैकी एक/दोघेही शिक्षण सेवक/तात्पुरत्या स्वरुपातील शिक्षक असतील तर.
- आवश्यक कागदपत्रे.
- स्वतः/पती/पत्नीचे कार्यरत प्रमाणपत्र.
- शाळा/कार्यालयाचे अंतराचे प्रमाणपत्र.
- पती-पत्नी एकत्र असल्याचा पुरावा (उदा., विवाह प्रमाणपत्र, नोकरीचे दस्तऐवज)
- विशेष शिक्षक संवर्ग भाग-२ साठी विंनती अर्ज
- वैयक्तिक मान्यता प्रमाणपत्र.(लागू असल्यास)
बदली प्रक्रियेसाठी शासनाने खालील नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.
सेवानिवृत्ती आणि बदली.
- कालावधी.
१ जुलै २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना २०२५ मधील बदली प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार देण्याचा अधिकार आहे.
- प्रक्रिया.
अशा शिक्षकांनी नकार पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, जिला परिषद किंवा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे सादर करावे.
- उद्देश.
सेवानिवृत्ती जवळ आलेल्या शिक्षकांना अनावश्यक बदली टाळण्याची संधी दिली आहे.
4) आंतरजिल्हा बदली प्रक्रिया.
- विशेष संवर्गाचा लाभ.
वरील जिल्हांतर्गत बदली प्रक्रिये प्रमाणेच आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्गाचा लाभ दिला जातो.
- पदोन्नती.
आंतरजिल्हा बदलीपूर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया (उदा., शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक) पूर्ण केली जाणार आहे.
- रिक्त जागा.
30 एप्रिल 2025 पर्यंत निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागांचा समावेश बदली प्रक्रियेत केला जाणार आहे.
- रोस्टर नियम.
पती-पत्नी बदलीसाठी रोस्टरचा विचार न करता अर्ज स्वीकारल्या जाणार आहेत.
- आपसी बदली.
शिक्षकांना परस्पर संमतीने ठिकाण बदलण्यासाठी आपसी बदली प्रक्रिया राबवली जाणार आहेत.
- उद्देश.
बदली प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य रीतीने राबवणे.
5) बदली प्रक्रियेचे महत्त्व.
विशेष संवर्ग शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजांनुसार योग्य ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. यामुळे शिक्षकांचे मनोबल वाढते, त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते, आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडतात. विशेषतः पक्षाघात, दिव्यांगत्व, आणि गंभीर आजार यासारख्या परिस्थितींमुळे प्रभावित शिक्षकांना या प्रक्रियेचा मोठा लाभ होतो. तसेच, पती-पत्नी एकत्रीकरण आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना विशेष सवलती मिळतात.
6). विशेष टिपा शिक्षकांसाठी.
- कागदपत्रांची पूर्तता.
बदलीसाठी अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पूर्ण, अचूक, आणि सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणित असावीत.
- मुदत.
शासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत अर्ज सादर करावेत. उशीर झाल्यास अर्ज नाकारले जाऊ शकतात.
-संपर्क.
काही शंका किंवा अडचण असल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी किंवा ग्रामविकास विभागाशी संपर्क साधावा.
- आपसी बदली.
आपसी बदलीचा पर्याय निवडताना परस्पर संमती, कागदपत्रांची पूर्तता, आणि शासन नियमांचे पालन सुनिश्चित करावे.
- वैद्यकीय प्रमाणपत्रे.
वैद्यकीय आधारावर बदलीसाठी अर्ज करताना सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणि जिल्हा शल्यचिकित्सकाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
7) शासन निर्णय संदर्भ.
- शासन निर्णय दि.१८ जून २०२४.
- शासन निर्णय दि.२३मे २०२३.
- शासन परिपत्रक: दि. २२ फेब्रुवारी २०१२, २२ फेब्रुवारी २०२२.
- शासन पत्र: दि. २ एप्रिल २०२३
- शासन निर्णय: दि. १८ जानेवारी २०२४, २३ नोव्हेंबर २०२२, २१ फेब्रुवारी २०१९
- या संदर्भांनुसार सेवा कालावधी, कागदपत्रे, आणि बदलीच्या अटी लागू आहेत.
8) शासन पत्र आणि परिपत्रकांचा आधार.
विशेष संवर्ग शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी शासनाने जारी केलेली परिपत्रके आणि पत्रे यांचा आधार घेतला जातो. यामध्ये दि. २२.२.२०१२ आणि २२.२.२०२२ ची परिपत्रके, दि. २.४.२०२३ चे शासन पत्र, आणि दि. १८.१.२०२४, २३.११.२०२२, २१.२.२०१९ चे शासन निर्णय यांचा समावेश आहे. या दस्तऐवजांमध्ये सेवा कालावधी, कागदपत्रे, आणि बदली प्रक्रियेच्या अटी स्पष्टपणे नमूद आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने विशेष संवर्ग शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी स्पष्ट, पारदर्शक, आणि सर्वसमावेशक नियमावली तयार केली आहे. ही प्रक्रिया शिक्षकांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः पक्षाघात, दिव्यांगत्व, गंभीर आजार, आणि पती-पत्नी एकत्रीकरण यासारख्या परिस्थितींमध्ये शिक्षकांना दिलासा मिळतो. शिक्षकांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. ही प्रक्रिया शिक्षकांच्या हितासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.