महाराष्ट्र शासन अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२६ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर केलेली आहे :-
(अ) सार्वजनिक सुट्ट्या.
अ. क्र. (१) सुट्टीचा दिवस (२) इंग्रजी तारीख (३) भारतीय सौर दिनांक (४) वार (५)
१) प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, २०२६, ६ माघ, शके १९४७, सोमवार
२) महाशिवरात्री, १५ फेब्रुवारी, २०२६, २६ माघ, शके १९४७, रविवार
३) छत्रपती शिवाजी महाराज जयंती, १९ फेब्रुवारी, २०२६, ३० माघ, शके १९४७, गुरुवार
४) होळी (दुसरा दिवस), ०३ मार्च, २०२६, १३ फाल्गुन, शके १९४७, मंगळवार
५) गुढीपाडवा, १९ मार्च, २०२६, २८ फाल्गुन, शके १९४७, गुरुवार
६) रमझान ईद (ईद-उल-फितर), २१ मार्च, २०२६, ३० फाल्गुन, शके १९४७, शनिवार
७) रामनवमी, २६ मार्च, २०२६, ०५ चैत्र, शके १९४८, गुरुवार
८) महावीर जन्म कल्याणक, ३१ मार्च, २०२६, १० चैत्र, शके १९४८, मंगळवार
९) गुड फ्रायडे, ०३ एप्रिल, २०२६, १३ चैत्र, शके १९४८, शुक्रवार
१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १४ एप्रिल, २०२६, २४ चैत्र, शके १९४८, मंगळवार
११) महाराष्ट्र दिन, ०१ मे, २०२६, ११ वैशाख, शके १९४८, शुक्रवार
१२) बुध्द पौर्णिमा, ०१ मे, २०२६, ११ वैशाख, शके १९४८, शुक्रवार
१३) बकरी ईद (ईद-उल-झुआ), २८ मे, २०२६, ०७ जेष्ठ, शके १९४८, गुरुवार
१४) मोहरम, २६ जून, २०२६, ०५ आषाढ, शके १९४८, शुक्रवार
१५) स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट, २०२६, २४ श्रावण, शके १९४८, शनिवार
१६) पारशी नववर्ष दिन (शहेनशाही), १५ ऑगस्ट, २०२६, २४ श्रावण, शके १९४८, शनिवार
१७) ईद-ए-मिलाद, २६ ऑगस्ट, २०२६, ०४ भाद्रपद, शके १९४८, बुधवार
१८) गणेश चतुर्थी, १४ सप्टेंबर, २०२६, २३ भाद्रपद, शके १९४८, सोमवार
१९) महात्मा गांधी जयंती, ०२ ऑक्टोबर, २०२६, १० आश्विन, शके १९४८, शुक्रवार
२०) दसरा, २० ऑक्टोबर, २०२६, २८ आश्विन, शके १९४८, मंगळवार
२१) दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन), ०८ नोव्हेंबर, २०२६, १७ कार्तिक, शके १९४८, रविवार
२२) दिवाळी (बलिप्रतिपदा), १० नोव्हेंबर, २०२६, १९ कार्तिक, शके १९४८, मंगळवार
२३) गुरुनानक जयंती, २४ नोव्हेंबर, २०२६, ०३ मार्गशिर्ष, शके १९४८, मंगळवार
२४) ख्रिसमस, २५ डिसेंबर, २०२६, ०४ पौष, शके १९४८, शुक्रवार
(ब) केवळ बँकांसाठी
खालील सुट्टी बँकांसाठी मर्यादित आहे. सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.
१) बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी.
१ एप्रिल, २०२६, ११ चैत्र, शके १९४८, बुधवार
अतिरिक्त सुट्टी
राज्य शासनाने आता खालील अतिरिक्त सुट्टी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे :-
१) भाऊबीज, ११ नोव्हेंबर, २०२६, २० कार्तिक, शके १९४८, बुधवार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा