शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

समग्र शिक्षा अभियान....

शाळा संयुक्त अनुदान

साभार आपल्या माहिती स्तव
(परिपत्रक जरूर वाचावे)

2018-19 पासून
सर्व शिक्षा अभियान आणि इतर उपक्रम एकत्रित करून
समग्र शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे.

त्यामुळे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मिळणारी विविध अनुदान जसे ,शाळा अनुदान, देखभाल अनुदान ,शिक्षक अनुदानआदी अनुदाने  मिळणार नसून सर्व बाबीसाठी एकत्रित *संयुक्त शाळा अनुदान*  मिळणार आहे.

काय आहेत निकष?
1)0ते 100 पटसंख्या-10,000रू
2)101 ते250पटसंख्या-15,000रु
3)251 ते 1000 पटसंख्या-20,000रु
4)1000 पेक्षाही जास्त पटसंख्या-25,000रु

संयुक्त शाळा अनुदान कोणत्या बाबी साठी खर्च करता येईल?

-क्रीडा साहित्य ,प्रयोगशाळा साहित्य ,आवश्यक भौतिक साधने खरेदी व दुरुस्तीसाठी

-इमारत देखभाल, शौचालय दुरुस्ती आणि इतर भौतिक सुविधा सुस्थितीत ठेवणे याकरिता

-स्वच्छता अभियान  साठी आवश्यक वस्तू खरेदी
जसे फिनाईल, साबण, डांबर गोळ्या ,झाडू ,कचरा कुंडी,ब्लिचिंग पावडर आदी ची खरेदी करिता

-एकूण निधीच्या 10%रक्कम स्वच्छता कार्य योजना वर खर्च करण्यात यावा
  शाळेने स्वछतेसाठी एक action plan बनवायचा असून त्यामध्ये नियोजन केल्याप्रमाणे खर्च करायचा आहे.

-वर्ग अध्यापना करीता शैक्षणिक साहित्य  निर्मितीसाठी अनुदान विनियोग करता येईल

-शाळेचे विद्युत देयक ,इंटरनेट,पाण्याची सोय आदी बाबीवर च खर्च करता येईल.

-शाळेत बालस्नेही वातावरण  निर्मिती च्या आवश्यक बाबीसाठी  खर्च करता येईल

-एकंदरीत शाळासंयुक्त अनुदान शाळेच्या प्रत्यक्ष आवश्यक गरजा लक्षात घेऊन,  व्यवस्थापन समिती च्या मान्यतेने सर्व बाबीसाठी खर्च करता येईल.

केवळ महितीस्तव ,,,

मला आवडलेला लेख

_डॉ. अल्बर्ट एलिस ._
_अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ._
_यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल ._
_विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती_ 
_(rational emotive behaviour thearapy )_
_हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध ._     
     _भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला ._
      _त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत ._

_१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो ._

_२) माणसाला वाटणारी भीती ही  कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते , परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते . पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक असते ._

_३)निराशा येणे ही  मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये  स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश  हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी  यश असू शकते . त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका ._

_४) जग काय म्हणेल हा विचार खोटा  आहे . प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता ._

_५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे . स्वतःचे अस्तित्व , आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही . दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा ._

_६) स्वतःला स्वीकारा . तुम्ही जसे आहात तसे . आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका  . कारण आयुष्य अजून संपलेले नाही .  दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता . कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा . जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल ._

_७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा . दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका ._

_८) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा  पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते ._

_९)दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे  फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच  अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा ._

_१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र  बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ  आहे . कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात . एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही ._

_११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही  व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगता. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते ._

_वरील सर्व हे नियम कालाबाधित आहेत . म्हणूनच या थोर मानसोपचार तज्ञाला आदराने प्रणाम !_

_मनुष्य स्वभाव गुणधर्म, व जीवनातील पुढील वाटचाल करतांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्या बाबत परखड विचार अधोरेखित करणारा लेख !!_
_खूप छान विचारसरणी !!!_

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.