शाळा संयुक्त अनुदान
साभार आपल्या माहिती स्तव
(परिपत्रक जरूर वाचावे)
2018-19 पासून
सर्व शिक्षा अभियान आणि इतर उपक्रम एकत्रित करून
समग्र शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे.
त्यामुळे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मिळणारी विविध अनुदान जसे ,शाळा अनुदान, देखभाल अनुदान ,शिक्षक अनुदानआदी अनुदाने मिळणार नसून सर्व बाबीसाठी एकत्रित *संयुक्त शाळा अनुदान* मिळणार आहे.
काय आहेत निकष?
1)0ते 100 पटसंख्या-10,000रू
2)101 ते250पटसंख्या-15,000रु
3)251 ते 1000 पटसंख्या-20,000रु
4)1000 पेक्षाही जास्त पटसंख्या-25,000रु
संयुक्त शाळा अनुदान कोणत्या बाबी साठी खर्च करता येईल?
-क्रीडा साहित्य ,प्रयोगशाळा साहित्य ,आवश्यक भौतिक साधने खरेदी व दुरुस्तीसाठी
-इमारत देखभाल, शौचालय दुरुस्ती आणि इतर भौतिक सुविधा सुस्थितीत ठेवणे याकरिता
-स्वच्छता अभियान साठी आवश्यक वस्तू खरेदी
जसे फिनाईल, साबण, डांबर गोळ्या ,झाडू ,कचरा कुंडी,ब्लिचिंग पावडर आदी ची खरेदी करिता
-एकूण निधीच्या 10%रक्कम स्वच्छता कार्य योजना वर खर्च करण्यात यावा
शाळेने स्वछतेसाठी एक action plan बनवायचा असून त्यामध्ये नियोजन केल्याप्रमाणे खर्च करायचा आहे.
-वर्ग अध्यापना करीता शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी अनुदान विनियोग करता येईल
-शाळेचे विद्युत देयक ,इंटरनेट,पाण्याची सोय आदी बाबीवर च खर्च करता येईल.
-शाळेत बालस्नेही वातावरण निर्मिती च्या आवश्यक बाबीसाठी खर्च करता येईल
-एकंदरीत शाळासंयुक्त अनुदान शाळेच्या प्रत्यक्ष आवश्यक गरजा लक्षात घेऊन, व्यवस्थापन समिती च्या मान्यतेने सर्व बाबीसाठी खर्च करता येईल.
केवळ महितीस्तव ,,,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा