बुधवार, १३ मे, २०२०

सन 2019-20-संचमान्यता विशेष...

या वर्षीची संचमान्यता स्थगित झाली होती पण ती स्थगिती उठवलेली आहे. तसेच जि.प.कडून आपल्याला विद्यार्थ्यांचे आधार कार्ड स्टुडंट पोर्टलला अपडेट करायला सांगितले आहे. ही बाब सर्व मुख्याध्यापकांनी गांभिर्याने घ्यावी. कारण या वर्षीची संचमान्यता करताना स्टुडंट पोर्टलला ज्या विद्यार्थ्यांचे आधार नंबर अपलोड करून ते व्हॅलिड झाले असतील तेवढाच आपल्या शाळेचा पट समजला जाणार व त्यावरच संचमान्यता होणार.त्यामुळे स्टुडंट पोर्टलवर आपला सर्व पट दिसतोय म्हणून गाफील राहीलात तर आपल्या शाळेतील शिक्षक पटानुसार कमी  मंजूर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आजच आपल्या शाळेचे स्टुडंट पोर्टलचे लाॅगिन करुन आधार कार्ड अपलोड केलेली टक्केवारी १००% असल्याची खात्री करावी
आधार अपलोड टक्केवारी पाहण्यासाठी खालील कृती करावी.
प्रथम Student पोर्टलचे लाॅगिन करावे.
त्यानंतर Reports टॅबमधील Status या टॅबवर क्लिक करुन Aadhar Status मध्ये जावे.
याठिकाणी आपल्याला युडायस क्रमांक/ शाळेचे नाव / एकूण पट / त्यापैकी आधार अपडेट केलेली विद्यार्थी संख्या / आधार अपलोड करायवयाची विद्यार्थी संख्या / आधार अपलोड केलेली शाळेची टक्केवारी दिसेल.ती जर १०० % असेल तर आपले काम पूर्ण आहे असे समजावे.आपला सर्व पट संचमान्यतेसाठी तयार आहे.
पण जर टक्केवारी १००% पेक्षा कमी असेल तर आपले आधार अपलोडेशनचे काम अपूर्ण असणार आहे व ते लवकरात लवकर आपणास पूर्ण करावयाचे आहे.
त्यानंतर दिसणा-या माहिती मधील U-DISE Code वर क्लिक करावे.
यानंतर आपल्याला इयत्तावार एकूण पट व त्यापैकी किती विद्यार्थ्यांचे आधार अपलोड केलेत, किती विद्यार्थ्यांचे बाकी अाहेत व त्याची टक्केवारी दिसेल.
ज्या वर्गातील आधार अपलोड १००  % नाही त्या वर्गातील नेमके कोणत्या विद्यार्थ्याचे अाधार अपलोड राहिले आहे ते जाणून घेण्यासाठी Remaining Students या काॅलममधील दिसणा-या अंकावर क्लिक करावे. आपल्याला त्या विद्यार्थ्यांची नावे दिसून येतील. 
या विद्यार्थ्यांचे आधार नंबर अपलोड केल्याशिवाय आपले सदरचे विद्यार्थी संचमान्यतेत गणले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. 

आधार नंबर अपलोड कसे करावेत
सदर विद्यार्थ्यांचे आधार नंबर अपलोड करण्यासाठी Student पोर्टल वरील वरील Excel टॅबवर जावे.
येथे दिसणा-या Download UID या टॅबवर क्लिक करावे.
यानंतर आपणास आधार अपलोड करावयाची इयत्ता निवडावी. Strem - Not Applicable असेलच. 
त्यानंतर Download File वर क्लिक करावे.
यानंतर UID व अापल्या शाळेचा युडायस नंबर व _01_0.xls नावाची फाईलची विंडो दिसेल.
यामधील Save file हा पर्याय निवडून OK बटणावर क्लिक करावे.
सदरच्या नावाची एक्सेल फाईल आपल्या Downloads या फोल्डरमध्ये आलेली असेल.
ती फाईल Open म्हंटल्यावर पुन्हा एक मेसेज दिसेल.त्यातील Yes या पर्यायाला निवडावे.
त्यानंतर आपण निवडलेल्या वर्गाची एक्सेल फाईल Open होईल.त्यामध्ये इयत्ता / तुकडी / विद्यार्थी आयडी / विद्यार्थी नाव / जन्मतारीख / लिंग / आईचे नाव ही माहिती भरलेली दिसेल.
त्यानंतर पुढील काॅलम रिकामे असतील यात आपणाला माहिती भरावी लागणार आहे.
माहिती भरण्यापूर्वी ह्या कृती कराव्यात.
एक्सेल फाईलच्या वर लाल अक्षरात दिसणा-या सूचना वाचून त्या क्रिया करा.
१. काॅलम J संपूर्ण निवडा.
  त्यावर Right Click करा.
  त्यानंतर Format cell वर क्लिक करा. त्यानंतर दिसणा-या लिस्ट मधील Category या लिस्ट मधील Text हा पर्याय क्लिक करुन निवडा व OK करा.
त्यानंतर प्रत्यक्ष माहिती भरायला सुरुवात करा. ही माहिती भरताना विद्यार्थ्याचे आधार कार्ड समोर असावे.( कारण सदरची माहिती भरताना As per Aadhar भरायची अाहे.) या फाईलमध्ये आधार नंबर / विद्यार्थ्याचे नाव / वडिलांचे नाव / आडनाव / जन्मतारीख / लिंग इ.माहिती आधार कार्डवर जशी आहे तशीच म्हणजे जसे स्पेलिंग आहे तशीच भरावी. शाळेत असलेली माहिती भरू नये.नाहीतर आधार डाटा अपलोड केल्यावर व्हॅलिड होत नाही. आधार कार्ड वर असणारी माहिती जशीच्या भरावी.त्यात कोणताही बदल करु नये.
त्यानंतर या फाईलचे रुपांतर  CSV (Comma delimited) या प्रकारात करून घ्यावे. पण ती फाईल आपण कोठे Save केली त्याचा Path  लक्षात ठेवावा.किंवा माहितीसाठी लिहून घ्यावा.शक्यतो ती फाईल डेक्सटाॅपवर सेव करावी. फाईल सेव करताना फाईलचे नाव अजिबात बदलू नये. नाहीतर फाईल करप्ट होते.
CSV केलेली फाइल उघडू नये. नाहीतर तर ती Courpt होते.  अपलोड होत नाही.

तयार केलेली फाईल अपलोड कशी करावी.
सदर CSV File अपलोड करण्यासाठी Student पोर्टलवरील Excel टॅबवर जावे.
त्यातील Uplod UID हा पर्याय निवडावा. त्यानंतर तेथे दिसणा-या select File समोर असणा-या  Browse वर क्लिक करावे. आपण CSV फाईल जेथे सेव केलेली असेल ती निवडावी.( एक्सेल फाईल नव्हे).
आपण फाईल निवडल्यावर तीचे नाव Upload या लाल बटणाच्या अलिकडे दिसू लागेल. आता आपली फाईल अपलोडसाठी तयार आहे. आता Upload या लाल बटणावर क्लिक करा. त्यानंतर ही फाईल दोन स्टेप मध्ये अपलोड होइल. दोन्ही स्टेप पूर्ण झाल्याचा मेसेज आल्यावरच आपली आधार फाईल अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.