गुरुवार, २८ मे, २०२०

एनएबीईटीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर.

 जेव्हा शाळा, कॉलेज उघडतील तेव्हा वर्गात दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. इतकेच नव्हे, तर वसतिगृहे, खाणावळी आणि वाचनालयासाठींही नवी नियमावली तयार करावी लागेल, अशी सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठीही विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत 'नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग' (एनएबीईटी) आणि 'क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया'ने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कोरोनानंतर शाळा, कॉलेज सुरू होतील तेव्हा वर्गातील सुरक्षाउपायांबाबत विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने या शिफारशी केल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

 शाळांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, बहुतांश शाळा या ऑनलाइन भरवाव्यात, अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
यात शाळांमध्ये विलगीकरण कक्षही तयार करावा, असे सूचित करण्यात आले आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला काही लक्षण दिसल्यास पुढील सुविधा उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्याला विलगीकरण कक्षात ठेवता येऊ शकते.

वाहतूक व्यवस्था
➡️शक्य असेल तेव्हा विद्यार्थ्यांना स्वत:च्या वाहनांनी प्रवास करण्यास सूचित करावे._
➡️विद्यार्थी आणि शिक्षक निरोगी असतील तेव्हाच शाळेत प्रवेश द्यावा._
➡️बसमध्ये सॅनिटायझर ठेवावे; तसेच बसमध्ये प्रवेश करताना मास्कची सक्ती करावी._
➡️बसमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये दीड मीटरचे अंतर असावे._

वर्ग असे भरावेत
➡️आवश्यकता नसेल त्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवू नये. जास्तीत जास्त वर्ग ऑनलाइन भरवावेत.
➡️वर्ग भरताना शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करावा. तसेच, मास्क आणि हातमोज्यांचाही वापर करावा.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये
➡️ संवाद साधताना दीड मीटर अंतर असावे.
➡️विद्यार्थी बसवतानाही दीड मीटर अंतर असावे. यासाठी वर्गातील विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी करून वर्ग भरवावेत.
➡️वर्गातील सर्व खिडक्या खुल्या ठेवाव्यात.
➡️वह्या, पुस्तकांना कमीत कमी स्पर्श करावा. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा.
➡️दर दोन तासांनी हात धुण्यासाठी घंटा वाजवावी.

शाळा प्रवेश.
➡️शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व प्रवेशद्वारांवर थर्मल स्कॅनर असावे.
➡️प्रत्येक प्रवेशद्वारावर हँड सॅनिटायझर बसवावे._
➡️शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गणवेश आणि पादत्राणांचे सॅनिटायझेशन होईल याची व्यवस्था असावी.
➡️गेटजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, असे नियोजन असावे.
➡️शाळेचे व्हरांडे, वर्गखोल्या, कॅफेटेरिया दर चार तासांनी स्वच्छ करावे. त्या पाण्यात एक टक्का सोडियम हायपोक्लोराइट असावे.
 
शाळेतील इतर उपक्रम.
➡️शाळांमध्ये २० पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.
➡️शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाइन लर्निंग आणि बेल्डेड लर्निंग या पर्यायांचा जास्तीत जास्त वापर करावा.
➡️शाळेतील माध्यान्ह भोजन सकाळी १० ते १ या वेळेत विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करून द्यावे.
➡️स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांनी सर्व सुरक्षाउपायांचे पालन करणे आवश्यक आहे.

स्वच्छतागृह
स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही, असे नियोजन करावे.
➡️स्वच्छतागृहात सतत पाणी वाहते असावे.
➡️साबण, हॅण्ड वॉशचा मुबलक पुरवठा करण्यात यावा.

इतर.
➡️शाळेत एक विलगीकरण कक्ष असावा.
➡️विद्यार्थ्यांच्या रोजच्या तापमानाची नोंद ठेवावी._
➡️शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित वैद्यकीय परीक्षण व्हावे.
➡️शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही स्वच्छतेचे प्रशिक्षण द्यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.