सोमवार, ९ जून, २०२५

ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत विशेष संवर्गाचा लाभ घेताना शिक्षकांनी घ्यावयाची दक्षता.

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत विशेष संवर्गाचा लाभ घेताना शिक्षकांनी घ्यावयाची दक्षता.
         विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांसाठी बदलीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया बदली पोर्टलवर नुकतीच सुरू झालेली आहे. या विशेष संवर्गाचा लाभ घेण्यासाठी बदली अर्ज भरतांना  एखादी चूक झाली तर ऑनलाईन बदली प्रक्रियेत आपली गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदली अर्ज भरतांना प्रत्येक शिक्षकांनी दक्ष असले पाहिजे. हा बदली अर्ज भरताना काय काय दक्षता घ्यायला हवी याबाबत संबंधित शासननिर्णयाच्या संदर्भाने सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विशेष संवर्ग भाग 1.
1)  विशेष संवर्ग भाग 1 चा लाभ घेऊ इच्छिणारे शिक्षकांचे अर्ज भरून घेतल्या जात आहेत या ठिकाणी पसंती क्रम देण्याची सुविधा अजून सुरू झालेली नाही.
2) विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत सूट हवी किंवा नको, म्हणजेच सूट घेण्यासाठी होकार किंवा नकाराची सुविधा मिळेल व संवर्ग 2 च्या शिक्षकांना फक्त होकार देता येईल.
3) विशेष संवर्ग भाग 1 चा लाभ घेऊ इच्छिणारे शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये बदली करून घ्यायची नाही त्यांनी अर्ज करताना नकार नोंदवावा म्हणजेच बदली प्रक्रियेतून सूट घेण्यासाठी होकार नोंदवावा, जेणेकरून आपली बदली पुढील कोणत्याही टप्प्यावर होणार नाही.
4) विशेष संवर्ग भाग 1 चा लाभ घेऊ इच्छिणारे  शिक्षकांची नावे बदली पात्र ,बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे टप्पा क्रमांक सात या तीनही यादीमध्ये नसतील व त्यांना बदली घ्यायची नसेल तर त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही.
5) ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 किंवा विशेष संवर्ग भाग 2 मधून बदली करायची असेल त्यांनी बदली पोर्टलवर होकार नोंदवावा म्हणजे बदली प्रक्रियेतून सूट घेण्यासाठी नकार नोंदवावा.
6) विशेष संवर्ग भाग 1 चा लाभ घेऊ इच्छिणारे शिक्षकांना या बदली प्रक्रियेतून सूट घेण्यासाठी नकार दिलेला आहे, म्हणजेच बदली करून घ्यायची आहे, त्यांनाच फक्त जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा बदली पोर्टलवर दाखवल्या जातील.
7) विशेष संवर्ग भाग 1 चा लाभ घेऊ इच्छिणारे शिक्षकांना या बदली प्रक्रियेतून सूट घेण्यासाठी नकार दिलेला आहे, म्हणजेच बदली करून घ्यायची आहे, त्यांना मागितलेल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास त्यांची बदली पुढील पात्र संवर्गातून होऊ शकते.
8) विशेष संवर्ग 1 विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा शासन निर्णयातील विशेष संवर्ग शिक्षकांच्या व्याख्येमधील नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.
9) विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत अर्ज करणाऱ्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरतेवेळी दाखवण्यात येतील म्हणजेच अर्ज भरताना रिक्त जागा दिसणार नाहीत.
10) विशेष संवर्ग भाग 1 पात्र शिक्षकांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम भरताना 1 ते 30 शाळा़चा समावेश करू शकतात, 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य नाही परंतु आपला प्राधान्यक्रम सबमिट होण्यासाठी किमान एक प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे.
11) विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना बदली करताना कार्यरत शाळेवरील सेवेची अट लागू राहणार नाही अर्थातच पहिल्यांदाच संवर्ग 1 मधून आपण बदली घेत असाल तर कार्यरत शाळेवर कितीही दिवस झाले असतील तरी सुद्धा आपण बदली करिता अर्ज करू शकतात.
12) विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष त्याच संवर्गातून विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
13) विशेष संवर्ग 1च्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षांपेक्षा कमी झालेली असेल व त्यांनी बदली प्रक्रियेतून सूट घेण्यास नकार दिलेला असेल तर त्यांना दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली होणार नाही व तसेच त्यांची पुढील कोणत्याही टप्प्यावर बदली होणार नाही तसेच संवर्ग 1 च्या शिक्षकांनी बदली करिता होकार दिलेला असेल व पोर्टलवर आपण प्राधान्यक्रम नोंदवलेला नसेल तरीसुद्धा आपली बदली होणार नाही.
14) विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षांपेक्षा जास्त झालेली असेल तर संवर्ग एकच्या शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार एकही शाळा मिळाली नाही तर त्या टप्प्यावर त्यांची बदली होणार नाही परंतु पुढील बदली टप्प्यामध्ये म्हणजेच बदली पात्र शिक्षक किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्यामध्ये त्यांचे नाव असल्यास संबंधित बदली टप्प्यामध्ये त्यांची बदली होऊ शकते.
15) विशेष संवर्ग भाग 1 पात्र शिक्षक बदलीसाठी सध्या ज्या शाळेत आहे ती शाळा पसंतिक्रमात निवडू शकणार नाहीत.
16) संवर्ग 1 ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 पेक्षा जास्त सलग सेवा झालेली असेल व त्यांनी पोर्टलवर होकार किंवा नकार नोंदवलेला नसेल तर त्यांची बदली ही बदली पात्र किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यावर होऊ शकते.
17) एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमत: बदलीसाठी प्राधान्य राहील.
18) सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदलीसाठी पात्र राहील.
19) विशेष संवर्ग भाग 1 चा लाभ घेण्यासाठी अर्ज भरताना.पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
- आपणास, "self" व "Spouse" असे दोन ऑप्शन दिसतील.
- जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर "self" आणि 
- जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर "Spouse" निवडा.
- आपण drop down मध्ये जाऊन आपला विशेष संवर्ग 1 मधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा. 
- self मध्ये एकूण1 ते 14 उपप्रकार आहेत.
- Spouse मध्ये 15 ते 20 उपप्रकार आहेत.
विशेष संवर्ग भाग 2.
1) विशेष  संवर्ग भाग 2 चा लाभ घेऊ इच्छिणारे शिक्षकांनी आपला फॉर्म भरत असताना. पती-पत्नी एकत्रिकरणा अंतर्गत लाभ घेणाऱ्या शिक्षकांना पोर्टलवर रिक्त जागा व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील.
2) त्याखाली  तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या शाळेचे/गावचे अंतर किलोमीटर मध्ये नोंदवा. हे अंतर 31 किंवा 31 किलोमीटर पेक्षा जास्त असावे.
3) त्यानंतर "विशेष संवर्ग भाग 2 चा प्राधान्यक्रम निवडा" या टॅब वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर drop down मधून आपला विशेष संवर्ग भाग 2 मधील आपल्याला लागू पडणारा प्राधान्य क्रमांक 1 ते 7 मधून निवडा.
4) विशेष संवर्ग भाग 2 चा लाभ घेऊ इच्छिणारे दोघेही जिल्हा परिषदचे कर्मचारी असाल तर आपल्याला पर्याय क्रमांक एक निवडावा लागेल आपण पर्याय क्रमांक एक निवडल्यानंतर त्याखाली आपल्याला  1) primary 2) other than primary  हे दोन पर्याय दिसून येतील.
5) आपण जर दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला त्यापैकी पहिला primary, पर्याय निवडावा लागेल.
 6) त्यानंतर पर्याय क्रमांक एक निवडला असेल तर अशा शिक्षकांना जोडीदाराचा खालील रखान्यांमध्ये शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
7) जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराची माहिती खालील रखान्यांमध्ये दिसून येईल.
8) आपला जोडीदार जिल्हा परिषद कर्मचारी असेल तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 other than primary  निवडावा लागेल.
9) पर्याय क्रमांक दोन निवडल्यानंतर आपल्याला खालील रकान्यामध्ये आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी टाकावा लागेल जोडीदाराचे नाव व जिल्हा परिषद कार्यालयाचे नाव टाकावे लागेल.
10) विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत पती-पत्नी एकत्रीकरण घेणाऱ्या शिक्षकाचा जोडीदार जिल्हा परिषदेचा कर्मचारी नसून इतर विभागाचा कर्मचारी असेल तर पर्याय क्रमांक 2 ते 7 नोंदवावा, दोघांमधील अंतर टाकायचे आहे आणि आपल्या जोडीदाराची मागितलेली माहिती नोंदवायची आहे.
11) विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत बदली अर्ज submit केल्यानंतर दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला दोन ओटीपी प्रविष्ट करावे लागतील व आपला जोडीदार इतर संवर्गात असेल तर या ठिकाणी फक्त एकच ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.
12) आपण भरलेला फॉर्म आपण पोर्टलवरूनच डाउनलोड करू शकता परंतु आपण भरलेली माहिती आपणास चुकीची वाटत आहे तर अशा परिस्थितीत आपण आपला फॉर्म withdrawal सुद्धा करू शकता.
ऑनलाईन बदली पोर्टल मधील  युनिट 1 ची कार्यवाही.
 1) बदली अधिकार पात्र शिक्षक म्हणजेच संवर्ग 3 मधील शिक्षक व बदली पात्र शिक्षकच म्हणजे संवर्ग 4 मधील शिक्षक  युनिट 1 अंतर्गत अर्ज करू शकतात.
 2) युनिट 1 संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती-पत्नीच्या कार्यरत शाळांमधील अंतर 30 किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे.
3) पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा जेष्ठतेनुसार बदली देण्यात येईल.
 4) दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास युनिट 1 म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाजेष्ठ बदली पात्र किंवा बदली अधिकार पात्र शिक्षकाने बदली पोर्टलवर युनिट 1 म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे आवश्यक आहे.
5) दोघांपैकी जो शिक्षक युनिट 1 करिता पसंतीक्रम देईल त्याच पसंतीक्रमातील शाळा दोघांनाही मिळणार आहेत.
6) युनिट 1 करिता अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी पसंती क्रम भरताना जास्तीत जास्त ज्या शाळेवर दोन पदे रिक्त आहेत अशाच शाळा प्राधान्याने निवडाव्यात त्यामुळे दोघांनाही निश्चितच एकच शाळा मिळण्याची शक्यता जास्त आहे.
7) दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास युनिट 1 करिता अर्ज करण्याकरिता पात्र असतात.
8) दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास युनिट 1 करिता अर्ज करण्याकरिता पात्र असतात.
9) दोघांपैकी एक शिक्षक बदली अधिकार पात्र व दुसरा बदली पात्र असल्यास युनिट 1 करिता अर्ज करण्याकरिता शिक्षक पात्र असतात.
10) दोघांपैकी एक शिक्षक बदली अधिकार पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रातील कितीही सेवा झालेला जोडीदार युनिट 1 करिता अर्ज करण्यास पात्र असतात.
11) दोघांपैकी एक शिक्षक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार  युनिट 1 करिता अर्ज करण्याकरिता पात्र असतात.
12) दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास बदली अधिकार पात्र टप्प्यातून जर  युनिट 1 म्हणून बदली करिता पसंती क्रम दिल्यास फक्त  युनिट 1 करिता सेवा जेष्ठ शिक्षकालाच पसंतीक्रम द्यावा लागेल, जोडीदाराचा पसंतीक्रम स्वीकारल्या जाणार नाही.
13) दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास बदली अधिकार पात्र शिक्षकांनी युनिट 1 मधून बदली करिता पसंतीक्रम दिला व दोघांनाही त्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाही तर दोघांचीही बदली केली जाणार नाही.
14) दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास युनिट 1 मधून बदली करिता पसंतीक्रम दिला व दोघांनाही त्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाही तर दोघांचीही बदली केली जाणार नाही परंतु संबंधित बदली अधिकार पात्र शिक्षक बदली पात्र असल्यास त्यांना बदली पात्र टप्प्यावर अर्ज करण्याची संधी राहील.
15) दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास आणि
जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना  युनिट 1 चा लाभ घ्यायचा असेल तर दोघांपैकी जो शिक्षक सेवाजेष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करिता अर्ज भरावा लागेल.
16) बदली पात्र टप्प्यामध्ये दोघांपैकी जो शिक्षक युनिट 1 म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.
17)  दोघांपैकी युनिट 1 करिता अर्ज केलेल्या एका शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला युनिट 1 अंतर्गत शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना त्यांनी दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार त्याच टप्प्यावर शाळा मिळेल किंवा विस्थापित टप्प्यामध्ये शाळा मिळेल.
18) वन युनिट करिता अर्ज करणारा एक शिक्षक बदली अधिकार पात्र असेल व दुसरा शिक्षक बदलीस पात्र असेल तर युनिट 1 करिता बदली अधिकार पात्र शिक्षकाला अर्ज करावा लागेल बदली पात्र शिक्षकाचा अर्ज याठिकाणी स्वीकारल्या जाणार नाही.
19) बदली अधिकार पात्र शिक्षकाने दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार दोघांनाही शाळा मिळाली नाही तर या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकांची बदली होणार नाही परंतु जोडीदार बदली पात्र असल्यामुळे संबंधित शिक्षकाला बदली पात्र टप्प्यावर पसंती क्रम देण्याची संधी मिळेल.
20)  एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली अधिकार पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही.
21) वन युनिट करिता अर्ज करणारा एक बदली अधिकार पात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली अधिकार पात्र शिक्षकाला 1 युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल
22) युनिट 1 करिता अर्ज केलेल्या बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या पसंती क्रमानुसार दोघांनाही बदली मिळेल परंतु बदली न मिळाल्यास दोघांचीही बदली होणार नाही.
23) दोघांपैकी एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार  युनिट 1 संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही.
24) वन युनिट करिता अर्ज करणारा एक बदली पात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली पात्र शिक्षकाला युनिट 1 अंतर्गत अर्ज करावा लागेल.
25) दोघांपैकी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदली पात्र शिक्षक नसेल अशावेळी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल या ठिकाणी जोडीदार बदलीस पात्र नसल्यामुळे जोडीदाराचा पसंतीक्रम नोंदविता येणार नाही.
26) पती-पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही.
27) युनिट 1 म्हणून लाभ घेतांना सर्वप्रथम दोघांनाही एका शाळेवर दोन जागा असतील तर अशा ठिकाणी दोघांनाही बदली देण्याचा प्रयत्न बदली पोर्टल करेल किंवा आपण दिलेल्या 30 शाळांच्या पसंतीक्रमामधून दोन शाळांवर दोघांनाही बदली देण्याचा सिस्टीम प्रयत्न करेन, वरील दोन्ही प्रकारातून आपणास बदली देता आली नाही तर सिस्टीम ज्या शिक्षकांनी  युनिट 1 करिता अर्ज केलेला आहे त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना बदली दिली जाईल.
28) युनिट 1 चा लाभ घेताना दोन्ही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना वन युनिटचा लाभ घेणे फायद्याचे ठरेल कारण यामध्ये सेवा जेष्ठ शिक्षकांबरोबर सेवा कनिष्ठ शिक्षकांना शाळा मिळू शकतात.
29) पती-पत्नीमध्ये सेवा जेष्ठतेचा खूप फरक असल्यास युनिट 1 चा लाभ घेणे फायद्याचे ठरते.
         सर्व शिक्षकांनी ott वरील ऑनलाईन बदली पोर्टल दररोज लॉग इन करून वेळापत्रक पाहावे, वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी. ऑनलाईन बदली पोर्टल वरील बदली इच्छुक सर्व शिक्षकांना बदलीसाठी हार्दिक शुभेच्छा.

वाचा... विशेष संवर्ग शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील आवश्यक पुराव्यांची माहिती.
https://vallabhgadhe.blogspot.com/2025/04/blog-post_28.html


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.