त्यानुसार राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या ज्या राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेचा विकल्प स्वीकारला असेल अशा प्रकरणी सदर अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती निश्चित केलेली आहे.
ज्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना आधीच NPS (National Pension System) लागू आहे, त्यांना सुधारीत राज्य पेन्शन योजना (Revised Pension Scheme) निवडण्याचा पर्याय दिला आहे.
मुख्य मुद्दे (Simple Points)
1) कोणाला लागू? जे कर्मचारी NPS मध्ये आहेत आणि त्यांनी नवीन (सुधारीत) पेन्शन योजना निवडली आहे
2) किती पेन्शन मिळेल? जर 20 वर्षे किंवा जास्त सेवा असेल
A) शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन मिळेल + महागाई भत्ता जर 10 ते 20 वर्षे सेवा असेल
B) सेवेनुसार थोडी कमी पेन्शन मिळेल
C) जर 10 वर्षांपेक्षा कमी सेवा असल्यास पेन्शन मिळणार नाही.
4) कुटुंब निवृत्ती वेतन (Family Pension):
कर्मचारी निधन झाल्यास कुटुंबाला पेन्शनच्या 60% रक्कम मिळेल
5) NPS मधले जमा रकमेबाबत काय करायचे?
निवृत्तीवेळी:
A) NPS मधून मिळणाऱ्या 60% रक्कम सरकारला जमा करावी लागेल
B) उरलेल्या 40% वर Annuity (महिना पेन्शन) मिळेल.
6) डबल फायदा कसा ठरवतात?
7) आधी NPS मधून पैसे काढले असतील तर?
काढलेले पैसे 10% व्याजासह परत भरावे लागतील, नाही भरले तर पेन्शन कमी मिळेल.
8) राजीनामा दिल्यास या योजनेचा फायदा मिळणार नाही, फक्त NPS चे फायदे मिळतील
9) ग्रॅच्युइटी (सेवानिवृत्ती उपदान) मिळणार (जुना नियम लागू)
10) कोणकोणाला लागू?
राज्य सरकारी कर्मचारी, ZP (जिल्हा परिषद) कर्मचारी, अनुदानित शाळा/कॉलेज कर्मचारी
11) महत्त्वाची तारीख.
ही योजना 01 मार्च 2024 पासून लागू
पर्याय (option) देण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2026
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा