शनिवार, १९ मे, २०१८

सेवापुस्तिकेतील गटविमा नोंदी....

सर्व सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी एक त्रुटी म्हणजे  गटविमा नोंदी.

गटविम्याच्या नोंदी मधे खालील प्रकारच्या त्रुटी आढळुन येतात...

१. गटविमा नोंद करतांना ज्या वेतन बिलात गटविमा वर्गणी कपात झाली त्या व्हाँवचर नंबर ची नोंद नसणे .

२.गटविमा नोंदीत खाडाखोड असणे.

३. शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी गटविमा वर्गणित झालेल्या बदलानुसार सुधारित नोंदी नसणे.

४. एखाद्या कर्मचा-याची पदोन्नती झाली असेल तर वेतनश्रेणीच्या अनुषंगाने गटविमा वर्गणी कपात नसणे.

५.सुधारित वर्गणी कपात उशिरा सुरु करण्यात आली असेल तर त्या वर्गणीच्या फरकाची नोंद नसणे.

६.गटविमा नोंदिवर गशिअ/ मुअ यांची स्वाक्षरी नसणे.

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे सेवानिव्रुत्ती नंतर गटविमा रक्कम परतावा परत घेतांना   वर्गणी कपात होवुन ही योग्य ती नोंद नसेल तर वर्गणीची रक्कम व्याजासह भरावी लागते.
त्या शिवाय आपल्याला आपली जमा असलेली गटविमा परताव्याची रक्कम जिल्हा परिषद देत नाही.

त्यामुळे कर्मचा-याने आपल्या गटविम्याच्या   नोंदी अद्यावयत आहे की नाही याची खात्री करावी.

रविवार, १३ मे, २०१८

जिल्हांतर्गत बदली अपडेट....

जिल्हांतर्गत बदलीबाबत...

मुख्याध्यापक लॉगीनला "Displaced TUC Transfer Application" ही टॅब येणार आहे.ह्या टॅबला ओपन केल्यावर शाळेतील सहशिक्षक,विषयशिक्षक व मुख्याध्यापक पद निवडल्यानंतर दोन प्रकारचे मेसेज येत आहेत.

१)Err... This Designation Data cannot be Available For Category 5....
असा मेसेज आला तर संबंधित शाळेतील शिक्षकांची बदली झाली नसेल किंवा त्यांनी दिलेल्या २० पर्यायांपैकी एक शाळा मिळाली आहे.

उदा.१)शाळेतील शिक्षकांनी प्रशासकीय प्रकारातून फॉर्म भरला असेल तर त्यांना खो मिळाला नसेल किंवा खो मिळून २० पर्यायांपैकी एक शाळा मिळाली आहे.
२)शाळेतील शिक्षकांनी विनंती प्रकारातून फॉर्म भरला असेल तर त्यांना २० पर्यायांपैकी एक शाळा मिळाली असेल किंवा २० शाळांपैकी एकही शाळा मिळाली नसल्याने त्यांची बदली झाली नाही.ते आहे त्या शाळेवरच राहतील.

२) शाळेतील शिक्षकांची नावे यादीत दिसत असतील तर...
या शिक्षकांना प्रशासकीय कारणाने खो बसलेला आहे परंतु दिलेल्या 20 शाळेपैकी एकही शाळा उपलब्ध नसल्यामुळे एकही शाळा मिळालेली नाही...

या यादीतील शिक्षकांनी २० पर्याय नव्याने नोंदविणे आवश्यक आहे.

यावेळी प्रशासकीय किंवा विनंती प्रकारातून फॉर्म भरला असेल तरीही खो बसल्याने बदली होत आहे आणि दिलेल्या २० पर्यायांपैकी शाळा मिळाली नाही.

केवळ माहीतीस्तव.....

बुधवार, ९ मे, २०१८

संत तुकारामांचा एक अभंग....

संत तुकोबांचा उपदेश

ऐसें संत जाले कळी ।
तोंडीं तमाखूची नळी ।।१।।
स्नानसंध्या बुडविली ।
पुढें भांग वोडवली ।।ध्रु.।।
भांगभुर्का हें साधन ।*
पची पडे मद्यपान ।।२।।
तुका म्हणे अवघे सोंग ।
तेथें कैचा पांडुरंग? ।।३।।

अर्थ व चिंतन -
अभंगाचं चिंतन वाचताना कुंभमेळ्यातले साधू डोळ्यासमोर आणून वाचा. तुकोबांच्याही काळात कुंभमेळे झालेत. त्यांना त्यात चाललेला व्यसनांचा बाजार मान्य नव्हता. कुंभमेळ्यात पांडुरंग असूच शकत नाही, ही त्याची ठाम भूमिका होती. आता इथं पांडुरंग का नाही? तर, इथं वारकरी भक्त नाही, म्हणून.

कुंभमेळ्यातले साधू तर निव्वळ व्यसनी आहेत. एक नव्हे तर अनेक प्रकारच्या मादक पदार्थांचा इथं राजरोस वापर होताना तुकोबांनी पहिला. इतरही अनेकांनी हे पाहिलं, पण ते तोंड बंद ठेवून होते. तुकोबांनी या विषयाला व्यापक स्वरूप दिलं. तुकोबा बोलले म्हणून ते खास ठरतात.

पुढच्या पिढ्यांवर पश्चातापाची वेळ, वाईट लोक 'अनेक' असतात म्हणून येत नसते, तर चांगले लोक  'शांत' बसतात, म्हणून येत असते. अशावेळी 'बोलणारे' तुकोबा समाजातील सन्माननीय व्यक्ती ठरतात.

या व्यसनी साधूंबद्दल बोलताना तुकोबा म्हणतात, "या कलियुगात असे काही संत झालेत की ज्यांच्या तोंडात तांबाकूने भरलेली चिलीम असते."

अनेक दिवस अंघोळीचा पत्ता नाही. "स्नानसंध्या तर बुडवलीच पण (चोवीस तास नशेत राहण्यासाठी) आपल्या पुढं भांग वाढून ठेवतात." आणि ती पीत राहतात, पीत राहतात.

लोकांच्या भक्तीची काही साधने असतात. नामस्मरण, चिंतन इत्यादी. पण या साधूंचं "भांग पिणे आणि चरस वगैरे सारख्या पदार्थाची भुकटी ओढणे, ही साधने आहेत. आणि (दारू तर कितीही प्या, चढतंच नाही.) दारू पिणे हे तर जणू यांच्या पचनी पडलेलं आहे."

म्हणून तुकोबा शेवटी म्हणतात, "हे सगळं निव्वळ सोंग आहे. आणि अशा सोंगाच्या ठिकाणी पांडुरंग कसा बरं असेल?"

तुकोबा म्हणतात, कुंभमेळ्यात पांडुरंग नाही. अहो, पांडुरंग तर पंढरपूरला. मग अशावेळी साहजिकच प्रश्न पडतो, वारकऱ्यांचं कुंभमेळ्यात काय काम?

शुक्रवार, ४ मे, २०१८

महागाई भत्त्याचे दर.....

महागाई भत्ते.....
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर
करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात 2006 पासून सुधारणा with date D.A.***********
1) 1.1.2006. Nil
2) 1.7.2006 2%
3) 1.1.2007. 6%
4) 1.7.2007. 9%
5) 1.1.2008. 12%
6) 1.7.2008. 16%
7) 1.1.2009. 22%
8) 1.7.2009. 27%
9) 1.6.2010. 35%
10) 1.11.2010. 45%
11) 1.5.2011. 51%
12) 1.10.2011. 58%
14) 1.1.2012. 65%
15) 1.7.2013. 72%
16) 1.1.2013. 80%
17) 1.7.2013. 90%
18) 1.5.2014.100%
19) 1.7.2014 107%(feb-15)
20) 1.1.2015 113% (Oct-2015)
21) 1.7.2015  119% (feb-16,)
22) 1.1.2016 - 125%
23) 1.7.2016 - 132%
24)  1.7.2017_136%

सेवापुस्तक अद्यावत करताना....

सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.

👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
👉३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
👉४. जात पडताळणी बाबतची नोंद.
👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
👉११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
👉१५. नाव बदलाची नोंद.
👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
👉१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
👉१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
👉२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
👉२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
👉२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
👉२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
👉२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
👉२५. रजा प्रवास सवलत नोंद.
👉२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
👉२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
👉२८. सेवा पडताळणीची नोंद.
👉२९. जनगणना रजा नोंद.
👉३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
👉३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद.

गुरुवार, ३ मे, २०१८

संत तुकाराम यांचा अभंग

संत तुकोबांचा उपदेश

गाजराची पुंगी ।
तैसे नवे झाले जोगी ।।१।।
काय करोनि पठन? ।
केली अहंता जतन ।।ध्रु.।।
अल्प असे ज्ञान ।
अंगीं ताठा अभिमान ।।२।।
तुका म्हणे लंड ।
त्याचें हणोनि फोडा तोंड ।।३।।

अर्थ व चिंतन -
लहान मुलं वाजवण्यासाठी गाजराची पुंगी बनवतात. ती वाजते तोवर वाजवतात आणि काम संपलं की खाऊन टाकतात. तुकोबा म्हणतात, "गाजराच्या पुंग्या बनतात तसे नवनवीन जोगी, साधू लोक तयार तयार झाले आहेत." असं पोटासाठीं बाह्यवेशाने जोगी बनलेल्या लबाड आणि दांभिक लोकांबद्दल तुकोबा राग व्यक्त करत आहेत.

ते पुढे म्हणतात, "अहो यांनी धर्मग्रंथांचं पाठांतर करून तरी काय केलं हो? अहंकार तर अंगात जशाला तसाच राहिला." ग्रंथ नुसतेच पाठ करणाऱ्यांना फार तर 'पाठक' म्हणता येईल. पाठांतर करणाऱ्याला ज्ञानी कसं म्हणता येईल? वाचलेल्या अक्षर-न-अक्षराचा अर्थ कळला आणि त्यानुसार वागणं घडलं तर त्याला ज्ञानी म्हणता येईल. पण या गाजराच्या पुंग्यासारखे पोटभरू तयार झालेले हे साधू म्हणजे लबाड म्हटले पाहिजे.

वाचन भरपूर आहे, पाठांतर बरचसं आहे पण सोबतच अहंकारालाही जपलं आहे, तर मग तो साधू लबाड समजावा.

नुसतंच वाचन आणि पाठांतराने ज्ञान मिळत नसतं. त्याला आकलन आणि अनुभव दोन्ही पाहिजे. पण हे गाजराच्या पुंगीसारखे तयार झालेले लोक "ज्ञानानं तर कमीच असतात, उलट यांच्या अंगात (वाचन आणि पाठांतर केल्याचा) ताठर अहंकार मात्र भरपूर असतो."

आणि म्हणून शेवटी तुकोबा म्हणतात, "अकलेनं पोकळ आणि अहंकाराने भरलेले हे जोगी, साधू लोक म्हणजे निव्वळ लबाड माणसं आहेत. म्हणून यांचं तोंड फटके हाणून फोडलं पाहिजे."

वारकरी संतांनी सांगितलेल्या लबाड साधूंच्या या खुणा आपण नीट समजून घेतल्या नाहीत. ज्यांना समजल्या त्यातल्या काहींना सोडलं तर बाकीच्यांना त्या समाजाला समजून सांगता आल्या नाही. म्हणून तर हे ढोंगी साधू लोक आपल्याला भेटतच राहतात. एक कारागृहात गेला की दुसरा मठ तयार करून तयारच असतो. दुसरा गेला की तिसरा आणि तिसरा गेला की चौथा. हे सगळं आपण आजही आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. रोज कुणी-ना-कुणी नवीन बाबा तयार झालेला वाचायला किंवा ऐकायला तर मिळेलच.

  

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.