शनिवार, २३ मे, २०२०

आदर्श विद्यार्थी कसा असावा....

विद्यार्थी कसा असावा....

➡️रात्री लवकरच झोपणे व सकाळी लवकरच उठणे.
➡️किमान 5/10 मिनिटं एका जागेवर शांत बसणे , एकाग्रता वाढविणे .
➡️सलग एक ते दोन तास एका जागेवर बसून वाचन , लेखन , अभ्यास करण्याची सवय लावणे .
➡️चांगल्या व आवश्यक सूचना ऐकूण घेवून त्यांवर विचार करण्याची सवय लावणे .
➡️घरातील लहान मोठ्या व्यक्तींशी चर्चा , संवाद साधने , विचारविनिमय करणे .
➡️आपली मते घरांतील व्यक्ती , शिक्षक , सहकारी मित्र यांचे बरोबर व्यक्त करणे .
➡️चांगले काय आणि वाईट काय याचा सारासार विचार करुन योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे .
➡️खरे काय , खोटे काय याची वास्तवाशी सांगड घालून पडताळा घेणे व सत्याच्या मार्गानेच जाणे .
➡️व्यवहारिक दृष्ट्या योग्य काय व अयोग्य काय याची समज येणे .
➡️अंधश्रद्धा न मानता विदवा विज्ञानाच्या  आधारावर , प्रत्यक्ष पडताळा घ्यायचा प्रयत्न करणे .
➡️मोबाईल , T V , सोशियल मेडिया याचा कामापूरता व मर्यादित वापर करणे .
➡️घरातील व घराबाहेरील कामे मनापासून करण्याची सवय लावणे .
➡️शिक्षण हे फक्त नोकरी मिळण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी नसून माणुस म्हणून जगण्यास लायक बनविण्यासाठी आहे हे रुजवीणे .
➡️नोकरी नाही मिळाल्यास कोणताही व्यवसाय करण्याची क्षमता प्राप्त करणे .
➡️आपल्या कुटुंबातील , समाजातील लहान मोठ्या व्यक्तींचा आदर राखण्यास शिकविण्यासाठी शिक्षण असावे .
➡️जिवनात नेहमीच आशादायी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करायला शिकवीणे .
➡️आपली क्षमता पाहून स्पर्धा करणे आवश्यक , अनावश्यक स्पर्धा टाळणे शिकणे आवश्यक .
➡️दुसरे करतात म्हणून आपणही तेच न करता वेगळे करण्याचा प्रयत्न करायला शिकवीणे .
➡️विनाकारण दुसऱ्यांना कमी लेखने व टीकाटिप्पणी करणे टाळावे .
➡️प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात ते घेण्याचा प्रयत्न करायाला शिकवीणे .
➡️परीक्षेत किती गुण मिळाले हे महत्वाचे नसून त्यांचेमध्ये किती नितिमुल्ये रुजली हे महत्वाचे आहे .
➡️अब्राहम लिंकनने  हेडमास्तर यांना लिहिलेले पत्र किमान आठवड्यातून एकदा वाचून  दाखवून त्याचा अर्थ स्पष्ट करुन सांगणे .
➡️साने गुरुजी यांचे शामची आई या व अशा  कथा वाचुन त्याचा अर्थ समजून घेण्यास शिकवीणे .
➡️स्वकष्टाने कमविलेल्या एका छदामची किंमत वाम मार्गाने कमवीलेल्यl घबाडापेक्षा किती तरी पटीने जास्त असते हे शिकणे आवश्यक आहे .
➡️फक्त चांगले इंग्रजी शिकला म्हणजे हुशार झाला असे नसून मातृभाषेतून संस्कार व व्यवहार  शिकला म्हणजे हुशार झाला .

आजकाल या व अशाच शिक्षणाबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे तर आणि तरच तो विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल आणि जिवन जगण्यास लायक होईल असे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.