सोमवार, २५ मे, २०२०

Income Tax फाईल

वर्षातून एकदा फॉम नंबर सोळा मिळाला की तो घरात कोणत्या तरी फाईल मध्ये टाकला जातो. जेव्हा एखादे लोन घेण्यासाठी 16 नंबर मागीतले जाते.तेव्हा मात्र घरात मागील तीन वर्षाचे 16 नंबर शोधतांना दमछाक होते.
मग केंद्रप्रमुख, केंद्रिय मुख्याध्यापक किंवा जे Tax चे काम बघतात त्यांना फोन जातो व पून्हा त्याची एक प्रत मागीतली जाते. त्यावर पुन्हा सही शिक्का घ्या.. या बाबी आल्याच.काही या आर्थिक बाबींचे योग्य वर्षानूरूप फायलींग करून ठेवत असतील ते कौतुकास्पदच...

आर्थिक बाबींचे योग्य जतन न केल्यामुळे अथवा आपण गाफिल राहिल्यामुळे या निष्काळजी पणाचा आपल्या एकदा तरी खूप त्रास होऊ शकतो किंवा झाला असेल. 
यावर उपाय म्हणजे बाजारातून एक चांगली छोटी बॉक्स फाईल व पेपर पंच  घेऊन त्यात आठवणीने आर्थिक रेकॉर्ड जपून ठेवणे.
यात आपण ठेऊ शकतो
1. आर्थिक वर्षाचे पगार पत्रक प्रिंट
2. Tax calculation Sheet
3. Form 16(Online & offline)
4. ITR Print
5. Acknowledgement Receipt 
6. Intimation 143(1) 
7. Tax बचतसाठी दिलेल्या पावत्या झेरॉक्स 

असे  सात ते आठ प्रकारचे पेपर्स आपल्याकडे असतील तर आपले त्या वर्षाचे आर्थिक रेकॉर्ड पूर्ण होते.
पण यातील आपल्याला फक्त 16 नंबर माहित असते.
तसे कार्यालया मार्फत आपल्याला फक्त फॉम नंबर सोळा देणे बंधनकारक असते तीच एक हार्ड कॉपी मागण्याचा आपला अधिकार असतो.. उर्वरीत डॉक्युमेंटस म्हणजे वरील अनुक्रम 4,5,6 हे आपल्याला ईमेलवर आपोआपच मिळत असतात.  त्याच्या  प्रिंट आपण स्वतः काढून जतन करून ठेवल्या पाहिजेत. 
Income Tax Return Copy, acknowledgement व Intimation 143 हे तीन डॉक्युमेंटस आपल्याला मिळण्यासाठी इनकम टॕक्स वेबसाईटवर  आपलाच Email Address नोंदवलेला असणे महत्त्वाचे असते. त्याच बरोबर Income Tax संबंधित मेसेजस येण्यासाठी वेबसाईटवर आपल्या स्वतःचा फोन नंबर तेथे इमेल सोबतच नोंदवलेला असावा लागतो. यावर आपण क्रमशः चर्चा करूयात
Pay statement... 
 वर्षभराचे पगारपत्रक softcopy किंवा Hardcopy या आपल्याकडे असाव्यात नव्हे ते आवश्यक आहेच.. खूप जनांना पगार कसा झाला म्हणजे महागाई किती, घरभाडे किती, बेसीक किती; याची आकडेमोड माहित नसते.
 जानेवारी फेब्रुवारी मध्ये Tax calculation शिट मध्ये दिलेले Gross पगार बरोबर आहे का हे तपासून बघीतले पाहिजे. हे तेव्हाच तपासता येईल जेव्हा आपल्याकडे वर्षभराचे पगारपत्रक असेल. बँकेत जमा झालेल्या पगाराचे विश्लेषण केले तरी ते सहज लक्षात येऊ शकते. 
 Tax calculation शीट मध्ये दाखवलेली गुंतवणूक बरोबर आहे का हेही काळजीपूर्वक बघीतली पाहिजे कारण त्यामुळे तुम्हांला कमी जास्त Tax लागू शकतो. बाकीचे calculation हे Tax शिट बनवणारे हे बरोबर करतात व ते तुम्ही मान्य केलेल्या आकड्यांवर अवलंबून असते.
 Calculation 
  याची हार्डकॉपी आपल्याकडे असावी. कारण यात Gross पेमेंट सोबतच कोणकोणत्या बचतीमुळे आपल्याला किती Tax बसला आहे हे कळते. हे तेच प्रपत्र आहे. जे आपण सही शिक्का करून त्याला पावत्या जोडून अॉफीसला परत देत असतो.
 फॉम नंबर 16.
हा टँक्स बाबत महात्वाचा दस्तऐवज आहे. याचे दोन प्रकार असतात. एक Online Form 16 आणि दुसरे Offline  Form 16.
A) Online Form 16. जेव्हा कार्यालय तुमचा कपात केलेला TDS चे रिटर्न फाईल केले जाते त्यानंतर  TDS वेबसाईटवरून हे जनरेट केले जाते. हा तितकासा महत्त्वाचा दस्तऐवज नाही कारण यात Gross वेतन व बचती बाबत जास्त तपशीलवार आकडेवारी नसते. व तपशीलवार नसल्यामुळे पुढे जेव्हा आपल्या Income Tax चे रिटर्न फाईल केले जाते. तेव्हा याची जास्त मदत होत नाही.  म्हणूनच कदाचित् कार्यालय आपल्याला हि online कॉपी प्रिंट देत नाही. व आपणाला ही हा तितकासा महत्त्वाचा नाही. म्हणून softcopy मध्ये असेल तर ठिक नसेल तर काहीच हरकत नाही. गेल्यावर्षी पासून यात थोडी डिटेल्स देण्याचा आयकर विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. पण अनेक सेक्शन्स जसे की 80U व 80DD याची माहिती नसते. यात 80C ची Gross बचत तपशीलवार नसते.
B) Form 16 (offline Copy) ही हार्डकॉपी कॉपी आपल्याला  कार्यालय देत असतेच. हा Tax चे काम करणारे यांच्याकडून Software वापरून तयार केलेला फॉम असतो. यावर सर्व बाबी डिटेल्समध्ये असतात. याची एक प्रिंट आपल्या आयकर फाईलला *असावीच.* हा फॉम आपल्याला होम लोन, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व बँकेत अनेक वेळा मागीतला जातो. रिटर्न फाईल करण्यासाठी याची गरज असते यावर अॉफीस प्रमुखाचा शिक्का व सही असते.  हा साधारणतः 1 एप्रिल ते  1 मे च्या दरम्यान  प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळायाला हवा. व हा एकच वरील सात आठ पैकी  अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज असल्यामुळे तो आपल्याकडे अतिशय व्यवस्थित फाईल करून ठेवावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.