सोमवार, १४ एप्रिल, २०२५

शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा...

विश्वरत्न..
भारतरत्न..
बोधिसत्व..
परमपुज्य..
महामानव..
युगपुरूष..
महाविदवान..
स्त्रीउध्दारक..
युगप्रवर्तक..
विश्ववंदनीय..
महान अर्थशास्त्री..
महान इतिहासकार..
भारताचे कैवारी..
भारत भाग्य विधाता..
सिंबाॅल आफॅ नाॅलेज..
ज्ञानाचा अथांग सागर..
कायदेपंडित..
विश्वभूषण..
कामगारांचे नेते..
महानायक..
महान इतिहासकार..
बँरिस्टर..
एक झुंजार पत्रकार....
लेखक....
संपादक....
प्रभावी वक्ते....
अद्वितीय संसदपटू.....
शिक्षणाचे अग्रदूत.....
विद्वत्तेचे महामेरू.....
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार...
समता, स्वातंत्र्य, बंधुता व राष्ट्रीय एकात्मता यांचे खंदे समर्थक...
 शेती, ऊर्जा व जलसंधारण या मुलभूत हक्कांचे प्रेरक....
पुस्तकासाठी घर बांधणारे जगातील एकमेव ग्रंथ प्रेमी....
स्त्री शिक्षण व स्त्री, स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते....
कामगार व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणारे लढवय्ये नेते....

विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा......!!!
ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन..         
आज भारताचे महान सुपुत्र, थोर समाजसुधारक, कायदेतज्ज्ञ आणि आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.

१४ एप्रिल १८९१ रोजी भीम राव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. एका दलित कुटुंबात जन्मूनही त्यांनी शिक्षणाच्या बळावर समाजात आपले स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या आयुष्यभर अन्याय, विषमता आणि अज्ञानाविरुद्ध लढा दिला.

बाबासाहेबांचे शिक्षण विलक्षण होते. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या नामांकित संस्था त्यांनी गाठल्या. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले आणि "शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा" हा मंत्र दिला.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र बाबासाहेबांनी फक्त सांगितला नाही तर ते आयुष्यभर या प्रमाणे जगले. बाबासाहेब विपरीत परिस्थितीत शिकले.खूप शिकले.खूप अभ्यास केला.विदेशात जाऊन शिकले. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात अनेक विषयात अनेक पदव्या मिळविल्या. खूप शिकल्यामुळे त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखता येऊ लागल्या. मागावर्गीय समाजावर होत असलेल्या अन्याय,अत्याचार, विषमता आणि भेदभावाची जाणीव या शिक्षणामुळे झाली.त्यामुळे त्यांनी सर्वांना खूप शिका असा महत्वाचा संदेश दिला. शिक्षणामुळे समता, समानता आणि बंधुभाव निर्माण करण्याचे महत्व सर्वांना कळेल अशी बाबासाहेबांना खात्री होती.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या संदेशात शिकल्यानंतर संघटित व्हा असे बाबासाहेबांनी सांगितले.चांगले आणि वाईट अशा दोन्ही कामांसाठी लोक एकत्र येतात.पण चांगल्या कामासाठी लोक एकत्र आल्यास त्यास संघटना म्हणतात.आणि वाईट कामासाठी लोक एकत्र आल्यास त्यास टोळी म्हणतात. चांगले काम करण्यासाठी लोक संघटित होऊन संघटना तयार व्हावी असे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. आणि शिक्षणाशिवाय भारतीय समाजाला आपले अधिकार व कर्तव्य कळणार नाही हे बाबासाहेबांना माहिती होते. स्वातंत्र्याविषयी बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, मग ते गुलामगिरी विरुद्ध पेटून उठतील. आणि याच गुलामगिरीची जाणीव शिक्षणामुळे लवकर होते, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी नेहमी शिक्षणाचा आग्रह धरला.आपला समाज या समाज व्यवस्थेविरुद्ध जागृत केला व संघटित केला.आणि म्हणूनच त्यांनी संघटित व्हा हा संदेश दिला.

शिक्का, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या संदेशात शिक्षणावर भर देऊन समाज संघटित केल्यानंतर बाबासाहेब आयुष्यभर या समाजात समता, समानता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी, विषमता व भेदभाव दूर करण्यासाठी संघर्ष केला. आणि आपल्या समाजाला या समाज व्यवस्थेतील अन्याय, अत्याचार, विषमता व भेदभावापासून कायमचे मुक्त केले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळावेत, हे संविधानामधून सुनिश्चित केले.

बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे संघर्ष, जिद्द आणि ज्ञानाचा प्रवास. त्यांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर लाखो वंचित, शोषित, आणि दुर्बलांसाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली.

आपण त्यांच्या विचारांचा आदर करतो, पण त्याहून अधिक आवश्यक आहे त्यांचा आदर्श आपल्या जीवनात उतरवणे. शिक्षण,समता,समानता आणि बंधुता या त्यांच्या तत्त्वांचा आपण अंगीकार केला पाहिजे.

चला, या जयंतीनिमित्त आपण ठरवू या — जातीपातीच्या भिंती पाडू, शिक्षणासाठी झटू, आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजूट होऊ.

जय भीम! जय भारत!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.