मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

प्राथमिक शाळेतील पायभूत साक्षरता व संख्याज्ञान कार्यक्रम म्हणजे काय?

पायभूत साक्षरता व संख्याज्ञान कार्यक्रम.
निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मोहीम २०२१ मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये पायाभूत साक्षरतेच्या व संख्या ज्ञानाच्या अनुषंगाने काही मूलभूत घटक व वयोगटनिहाय ध्येय देण्यात आली आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार,  प्राथमिक स्तरावर पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातील साक्षरता व संख्याज्ञान ही पायाभूत कौशल्य प्राप्त केल्याशिवाय हे नवीन शिक्षण धोरण यशस्वी होणार नाही. त्यासाठी हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने निर्देशित केलेला आहे. त्यातील शासनाला अपेक्षित आवश्यक कार्यवाही प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी करणे आवश्यक आहे.


1. उद्दिष्ट (उद्देश):

A)इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) प्राप्त व्हावे.

B)2026-27 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत कौशल्ये प्राप्त करणे हे लक्ष्य आहे.

C)विशेषतः 75% विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे.

2. कृती कार्यक्रमाची व्याप्ती:

A)सर्व प्रकारच्या शाळा (सरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित) आणि सर्व माध्यमे यांचा समावेश.

B)इयत्ता 2री ते 5वीचे सर्व विद्यार्थी.

C)इयत्ता 6वी ते 8वीचे शिक्षक आणि विद्यार्थी पर्यायी स्वरूपात सहभागी होऊ शकतात.

3. अंमलबजावणी कालावधी:

A)5 मार्च 2025 ते 30 जून 2025

B)सुट्ट्यांचा वापर करूनही अतिरिक्त अभ्यासक्रम राबवावा.

4. मूल्यांकन व सादरीकरण:

A)शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन क्षमतेचे मूल्यांकन करावे.

B)"चावडी वाचन व गणन" कार्यक्रमामार्फत पालक आणि समुदायासमोर विद्यार्थ्यांचे सादरीकरण करावे.

C)विद्यार्थ्यांची प्रगती VSK (विद्या समीक्षा केंद्र) द्वारे ऑनलाइन नोंदवावी.

5. अपेक्षित अध्ययन क्षमतांचा तपशील:

A)वाचन, लेखन, संख्याज्ञान व अंकगणितातील (number operations) प्रगती पातळ्यांनुसार.

B)इयत्ता 2री साठी 14-16 पातळ्या, इयत्ता 3-5 साठी 15-29 पातळ्या.

6. शिक्षकांची भूमिका:

A)प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र कृती नियोजन करावे.

B)सुटीच्या काळातही संपर्कात राहून अध्ययन चालू ठेवणे.

C)प्रगती अहवाल भरणे आणि वेळोवेळी अपडेट करणे.

7. मुख्याध्यापक आणि प्रशासनाची जबाबदारी:

A)शिक्षकांना नियोजन व साधने उपलब्ध करून देणे.

B)शाळाभेटीत मार्गदर्शन व सहाय्य.

शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामसभा यामार्फत सहभाग वाढवणे.

8. प्रशिक्षण व साहित्य:

A)राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत साहित्य, प्रशिक्षण, विडीओज्, कार्यपुस्तिका उपलब्ध करून दिले जाणार.

B)maa.ac.in वर FLN अंतर्गत साहित्य व साधने उपलब्ध आहेत.

9. प्रशस्तीपत्रक व प्रोत्साहन:

A)उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.

B)उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.

10. सामाजिक सहभाग (Social Audit):

A)प्रत्येक 15 दिवसांनी “चावडी वाचन व गणन” कार्यक्रम घ्यावा लागणार.

B)पालक, ग्रामसभा यांचा सहभाग अनिवार्य.

C)विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे सादरीकरण करावे.

11. विशेष बाब.
नव्याने दाखल होणारे विद्यार्थीही अभियानाचा भाग होऊ शकतात.

चुकीची माहिती देणे टाळणे, योग्य वेळेस योग्य मूल्यांकन करणे आवश्यक.

हे अभियान म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक वाचन, लेखन आणि गणित कौशल्ये दृढ करण्यासाठी एक ठोस व कालबद्ध कार्यक्रम आहे. त्यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि स्थानिक यंत्रणांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.