बुधवार, १६ एप्रिल, २०२५

शिक्षकांसाठी अध्ययन निष्पत्तीचे महत्व...

शाळेतील सतत चालणारी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये ठराविक कालावधीत क्षमता प्राप्त होतात, म्हणून अध्यापनाच्या उपलब्धीचे निकष आवश्यक आहेत.त्यामुळे शिक्षक अध्ययनाचे निरीक्षण करू शकतील आणि त्यांचा मागोवा घेऊन विद्यार्थ्यांच्या गरजांना सतत प्रतिसाद देऊ शकतील.या निकषांनाच अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात.अशाप्रकारे अध्ययन निष्पत्ती या क्षमता प्राप्त करण्याच्या मार्गातील प्रगती दर्शविणारे लहान लहान टप्पे आहेत.अध्ययन निष्पत्ती शिक्षकांना त्यांचा आशय,अध्यापन आणि क्षमता प्राप्त करण्याच्या दिशेने मूल्यमापाचे नियोजन करण्यासाठी सक्षम करतात.त्यासाठी शिक्षकांनी अध्ययन निष्पत्तीचे महत्व लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
1. अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय?
A)शिक्षणातून मुलांमध्ये कोणती विशिष्ट शैक्षणिक क्षमता विकसित झाली पाहिजे, याचे मोजमाप करणारी प्रणाली.
B)शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यानंतर विद्यार्थी कोणती कौशल्ये आत्मसात केली आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त.

2. शिक्षणविषयक भूमिका:
A)विद्यार्थी हे स्वतःचे ज्ञान स्वतःच्या अनुभवातून निर्माण करतात.
B)अध्यापन प्रक्रियेमध्ये भाषा, परिसर आणि सामाजिक संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे.
C)विविध भाषिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी असल्याने, त्यांची मातृभाषा सन्मानपूर्वक वापरून शिक्षण देणे गरजेचे.

3. भाषा शिक्षणातील दृष्टिकोन:
A)श्रवण, भाषण, वाचन, लेखन – ही भाषा कौशल्ये परस्परावलंबी आहेत.
B)वाचन आणि लेखन हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले पाहिजे.
C)विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करणे (बालसाहित्य, चित्रकथा, कविता इ.)

4. प्राथमिक इयत्तांनुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती (मराठी विषय):
इयत्ता 1 ते 5 साठी काही उदाहरणे:
इ.1: चित्राच्या आधारावर कथा सांगणे, ऐकलेली गोष्ट पुनः सांगणे.
इ.2: गोष्टी वाचून अनुभव शेअर करणे, कविता लक्षपूर्वक ऐकणे व म्हणणे.
इ.3: गोष्टी समजून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देणे, स्वतः लेखन करणे.
इ.4: वाचनातून सूचना समजून घेणे, वेगवेगळ्या लेखन प्रकारांचे अनुकरण करणे.
इ.5: वाचन/लेखनात विषयवस्तू, संदर्भ, भावना, मत व्यक्त करणे, समालोचन करणे.

5. गणित विषयाचे मुद्दे:
A)अभ्यासक्रमाच्या अपेक्षा लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारातील गणित समजेल अशा पद्धतीने अध्यापन करणे.
B)गणिती कल्पना प्रत्यक्ष उदाहरणे आणि सृजनशील कार्यपद्धतींनी शिकवणे.
C)पाठांतर न करता समजून घेण्यावर भर देणे.
D)कल्पना, समस्या सोडवण्याची प्रक्रिया, तर्कशुद्ध विचार यावर आधारित शिक्षण देणे.

6. अध्यापन पद्धतीबद्दल सूचना:
A)विद्यार्थ्यांच्या अनुभवांवर आधारित शिक्षण हवे.
B) सहभागी व चाचणी प्रक्रियेतून प्रगतीचे मूल्यांकन करावे.
C)समूह, खेळ, चित्र, गोष्टी, नाट्य यांच्या माध्यमातून शिकवण्याचा सल्ला.
D)शिक्षकांनी अध्यापन पद्धती स्थानिक गरजांनुसार बदलाव्यात.

‘अध्ययन निष्पत्ती’ म्हणजे शिकण्याचे उद्दिष्ट स्पष्ट करणारी मोजमापाची चौकट.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन हे त्यांच्या सक्रिय सहभागातून आणि अनुभवांवर आधारित असावे.
भाषा आणि गणित शिकवताना विद्यार्थ्यांची सामाजिक, भाषिक आणि वैयक्तिक पार्श्वभूमी विचारात घ्यावी.
या सर्व बाबी शिक्षकांनी लागत घेऊन कार्यवाही केली तर शिक्षकाचे अध्ययन अध्यापन अधिक यशस्वी व अधिक समृद्ध होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.