गुरुवार, १५ मे, २०२५

12 वी नंतर ऍडमिशनसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

12 वी नंतर ऍडमिशन साठीलागणारे कागदपत्रे.
     JEE चा निकाल नुकताच लागलेला आहे. तर NEET व MHT-CET चे निकाल लवकरच लागणार आहे. बहुतांश विद्यार्थी व पालक उच्च शिक्षणासाठी मेडिकल व इंजिनियरिंग या शाखांना पसंती देतात. प्रवेशावेळी आवश्यक लागणारे कागदपत्रे जमवाजमव करण्यासाठी ऐनवेळी एकदमच धावपळ उडतांना दिसते.ही धावपळ होऊ नये म्हणून या प्रवेश प्रक्रियेवेळी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची माहिती आपण आज जाणून घेऊ.
मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे.
1) NEET/MHT-CETआँनलाईन फाॅर्म प्रिंट
2) NEET/MHT-CET प्रवेश पत्र
3) NEET/MHT-CET मार्क लिस्ट
4) 10 वी चा मार्क मेमो
5) 10 वी सनद
6) 12 वी मार्क मेमो
7) नॅशनॅलीटी सर्टीफिकेट
8) रहिवाशी प्रमाणपत्र
9) 12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाॅन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 
इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे.
1) JEE/MHT-CET आँनलाईन फाँर्म प्रिंट
2) JEE/MHT-CET पत्र
3) JEE/MHT-CET मार्कलिस्ट
4) 10 वी चा मार्क मेमो
5) 10 वी सनद
6) 12 वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8) रहिवाशी प्रमाणपत्र
9) 12 वी टी सी
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते
13) फोटो
मागासवर्गीय प्रवर्गासाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.