शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

कर्मचाऱ्यांनी सेवापुस्तिकेत कोणकोणत्या नोंदी करणे आवश्यक असते?

कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तिकेतील आवश्यक नोंदी:
       खासगी आस्थापना तसेच शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या सेवासंबंधित सर्व माहितीची नोंद ठेवण्यासाठी सेवापुस्तिका हे एक अत्यंत महत्त्वाचे व अधिकृत दस्तऐवज आहे. ही नोंद कर्मचारी व प्रशासकीय विभागासाठी कायदेशीर आधार असते. त्यामुळे सेवापुस्तिकेतील नोंदी अचूक, सुसंगत आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे.
       सेवापुस्तिका (Service Book) हा प्रत्येक शासकीय/अर्धशासकीय कर्मचाऱ्याच्या सेवेचा अधिकृत आणि महत्त्वाचा दस्तऐवज आहे. वेतन, बढती, वेगळ्या सुविधा, निवृत्तीचे लाभ यांसाठी सेवापुस्तिका आधारभूत असते. सेवापुस्तिकेत कोणकोणत्या नोंदी करणे आवश्यक आहे, याचे सविस्तर विवेचन खालीलप्रमाणे.
       सेवापुस्तिकेत खालीलप्रमाणे विविध नोंदी असणे आवश्यक असतात:
1). व्यक्तिगत माहिती:
1)संपूर्ण नाव (इंग्रजी व मातृभाषेत)
2)जन्मतारीख (प्रमाणपत्रानुसार)
3)जन्मस्थान, जात, उपजात, धर्म
4)वैवाहिक स्थिती
5)शैक्षणिक पात्रता
6)ओळखपत्र क्रमांक (आधार कार्ड, पॅन, इ.)
2). सेवेतील नियुक्तीची माहिती:
1)पहिल्या नियुक्तीची तारीख, पद, ठिकाण व कार्यालय.
2) मूळ नियुक्तीचा आदेश क्रमांक व तारीख
3)नोकरीचा प्रकार (तत्कालीन, कायम, करार)
4)सेवाश्रेणी (गट अ, ब, क, ड)
5)पदोन्नती/स्थलांतराचे तपशील
6)कार्यमुक्ती व हजर होण्याचा तपशील
7)दोन नियुक्तीमध्ये खंड असल्यास आणि तो क्षमापित असल्यास त्याची नोंद.
8)सेवा जॉईनिंगची तारीख व कार्यग्रहणाची नोंद
9)पदोन्नती, बदल, स्थानांतर, पुनर्नियुक्ती याबाबत आदेश व नोंदी.
10)दोन नियुक्तीमध्ये खंड असल्यास आणि तो क्षमापित असल्यास त्याची नोंद.
3). पगार व वेतनश्रेणी:
1)मूळ वेतन, वेतनश्रेणी, ग्रेड पे / लेव्हल
2)पगारवाढीच्या तारीखा
3)वेतन आयोगानुसार सुधारणा
4)वेतन रोखून ठेवण्याच्या किंवा कपात करण्याच्या नोंदी
5)वेतन निश्चिती व त्यातील बदल (PRC, वेतनवाढ इ.)
6)भविष्य निर्वाह निधी (GPF/CPF) खाते क्रमांक व नोंद
7)गटविमा योजनेतील सदस्यत्व व वर्गणी
8)वेतन आयोगनुसार वेतन समानीकरण.
4). शिक्षण व प्रशिक्षण:
1)सेवा कालावधीत घेतलेली प्रशिक्षण / कार्यशाळा
2)प्रशिक्षणाचा कालावधी, ठिकाण व विषय
3)पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती (सेवेतील)
5). सेवाकालातील बदल:
1)बढती / पदोन्नती (तारीख व पद)
2)बदल्या (ठिकाण व आदेश क्रमांकासह)
3)प्रतिनियुक्ती, तात्पुरती नेमणूक
6). गैरहजेरी / रजा:
1)मंजूर झालेल्या रजा (प्रकार, कालावधी)
2)परत हजर होण्याची तारीख
3)विनामोबदला अनुपस्थिती / निलंबनाची नोंद
4)विविध प्रकारच्या रजा (अर्जित, वैद्यकीय, प्रसूती, जनगणना, सुट्टी इ.)
5)रजा मंजुरी, रजा रोखीकरण, रजा प्रवास सवलत
6)अनधिकृत गैरहजेरी व त्यागपत्र/राजीनामा संबंधी नोंदी.
7). शिस्तभंग व शास्तीची नोंद:
1)कारणे दाखवा सूचना.
2)चौकशी अहवाल.
3)शिक्षा (इशारा, वेतन कपात, सेवा समाप्ती, इ.)
4)न्यायालयीन प्रकरणे.
8) विशिष्ठ घटनांची नोंदी
1)सेवेतून कमी/सस्पेंशन/शिस्तभंग शिक्षेची नोंद
2)पुनर्नियुक्तीचे आदेश
3)पुरस्कार, गौरव, तदनुषंगिक लाभ
4)वार्षिक सेवा पडताळणी, प्रमाणपत्र देणे.
5)सेवेतील विशेष पुरस्कार, प्रमाणपत्रे
6)उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव.
9). सेवानिवृत्ती / मृत्यू:
1)सेवानिवृत्तीची तारीख
2)सेवानिवृत्तीपूर्व लाभ / अर्ज
3)मृत्यूची नोंद (सेवेतील)
4)वारस नोंद व लाभ हस्तांतरण
10). इतर महत्त्वाच्या नोंदी:
1)गॅझेट नोटिफिकेशन्स / सेवाशर्तीतील बदल.
2)विमा, पेन्शन, GPF/CPF खाती.
3)उचललेल्या कर्जाची माहिती (गृहकर्ज, वाहन, इ.)
4)सेवा पुष्टी, कायमस्वरूपी नेमणूक आदेश
5)सेवापुस्तिकेची प्रत्येक वर्षी व वेळोवेळी पडताळणी व प्रमाणित करणे आवश्यक आहे.
6)दुय्यम सेवापुस्तकाची नोंद व कर्मचाऱ्याने स्वाक्षरी करणे.
7)कार्यालय प्रमुखाने नमूद केलेल्या नोंदींची नियमित वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.
8)विवाह, नाव बदल, नामनिर्देशन (पेंशन, विमा, निवृत्ती लाभ, मृत्यू उपदान)
9)स्त्री कर्मचार्यांसाठी पालक निवड नोंद.
10)सेवार्थ आयडी, आधार क्रमांक, पॅन, DDO कोड नोंद
11)भाषा परीक्षा उत्तीर्ण/सूट झाल्याची नोंद, प्रशिक्षणाची नोंद.
सेवापुस्तिकेचे अद्ययावतपणाचे महत्त्व:
1)पदोन्नती, बदल्या, वेतनवाढ, निवृत्ती, पेन्शन इत्यादी बाबतीत सेवापुस्तिका हा एकमेव अधिकृत दस्तऐवज असतो.
2)सेवापुस्तिकेत चूक किंवा अपूर्ण माहिती असल्यास कर्मचारी आर्थिक व प्रशासकीय अडचणीत सापडू शकतो.
3)त्यामुळे सेवापुस्तिकेचे वेळोवेळी अद्ययावत करणे ही कर्मचार्‍याची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त जबाबदारी आहे.
      सेवापुस्तिका म्हणजे कर्मचार्‍याच्या सेवाजिवनाचा आरसाच होय. यातील प्रत्येक नोंद ही त्याच्या भविष्यातील हक्क व लाभांवर परिणाम करणारी असते. म्हणूनच ही नोंद अचूक व पूर्ण असावी याची दक्षता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय, पोलिस, महापालिका अशा सर्वच शासकीय क्षेत्रांतील कर्मचार्‍यांसाठी ही बाब लागू होते.
        सेवापुस्तिका ही कर्मचाऱ्याची सेवा, वेतन, रजा, पदोन्नती, लाभ, निवृत्ती हे सर्व बाबी स्पष्ट करणारा एकच दस्तऐवज आहे. वेळोवेळी नोंदी अद्ययावत असल्यास भविष्यात सेवा-लाभ, निवृत्ती किंवा इतर फायदे घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. कार्यालय प्रमुखांनी सेवापुस्तिका अपूर्ण किंवा चुकीची राहू नये याची काळजी घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.