शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

RTSE-2019

🎤 *अत्यंत महत्त्वाची सुचना*🎤
         ⏰ *व खुशखबर* 💾

*महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी ,पालक व शिक्षकांना कळविण्यात येते कि, आज दि.31-08-2018 रोजी सायंकाळी 6 वा RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION च्या नियामक मंडळाची बैठक संपन्न झाली.सदरील बैठकीत RTSE 2019 साठी आवदेन पत्र दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती परंतु पुणे,मुंबई सह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पालक व शिक्षकांनी आवदेन पत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासुन रेटा लावुन धरला होता यावर  सविस्तर चर्चा झाली. व नियामक मंडळातील अनेक सदस्यांनी विद्यार्थीहित लक्षात घेता RTSE 2019 साठी नाव नोंदणीस मुदतवाढ देण्याची विद्यार्थी , पालक व शिक्षकांची  मागणी मान्य करण्यास सहमती दिली.नियामक मंडळाच्या परवानगीने सदरील बैठकीत RTSE 2019 साठी ONLINE व OFFLINE  आवेदन पत्र / EXAMINATION FORM भरण्यासाठी दिनांक 15-09-2018 पर्यत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.*

*तरी सर्व विद्यार्थी ,पालक व शिक्षकांना सदरील निवेदनाद्वारे आवाहन करण्यात येते कि ,कृपया आपण विहीत वाढीव मुदतीत आपले आवेदन पत्र EXAMINATION FORM भरावेत.दिनांक 15-09-2018 नंतर कुठल्याही सबबीवर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी ही विनंती*

*RATIONALIST TALENT SEARCH EXAMINATION (RTSE) 2019 साठी इयत्ता दुसरी ते नववीतील विद्यार्थ्यांना आँनलाईन /ONLINE फाँर्म/FORM भरण्याची सुविधा  उपलब्ध करुन देण्यात येत आहे.ज्या विद्यार्थ्यांना शाळेतुन फाँर्म भरण्याची सुविधा नाही अश्या विद्यार्थ्यांना  खालील  लिंक वरुन आपले परिक्षा फाँर्म भरता येतील.आपल्या शाळेचे नाव सदरील लिंक वरील शाळांच्या यादीत दिसत नसेल तर कृपया आपल्या शाळेचे पूर्ण नाव व पूर्ण पत्ताचा 8830497711 ह्या मोबाईल क्रमांकावर SMS करावा.सदरील शाळेचा डाटा  आमच्या कार्यालयाकडून SMS मिळाल्यानंतर त्याच दिवशी UPDATE  केला जाईल व तदनंतर आपणांस परीक्षा फाँर्म भरता येईल. अधिक माहितीसाठी आमच्या WWW.RTSEXAM.COM ह्या संकेत स्थळाला भेट द्या*

*ज्या शाळांमध्ये सदरील परीक्षा फार्म त्याच शाळेत भरण्यासाठी उपलब्ध आहेत अशा शाळांतील विद्यार्थ्यांना  आँनलाईन फाँर्म / ONLINE FORM भरण्याची आवश्यकता नाही दरवर्षी प्रमाणे त्यांचे आँफलाईन फाँर्म/OFFLINE FORM संबंधित शाळेकडून किंवा आमच्या अधिकृत RTSE समन्वयकाकडून स्विकारले जातील*

🍁 *आपला परिक्षा फाँर्म भरण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावे* 📋

http://rtsexam.com/order-online/

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

समग्र शिक्षा अभियान....

शाळा संयुक्त अनुदान

साभार आपल्या माहिती स्तव
(परिपत्रक जरूर वाचावे)

2018-19 पासून
सर्व शिक्षा अभियान आणि इतर उपक्रम एकत्रित करून
समग्र शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे.

त्यामुळे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मिळणारी विविध अनुदान जसे ,शाळा अनुदान, देखभाल अनुदान ,शिक्षक अनुदानआदी अनुदाने  मिळणार नसून सर्व बाबीसाठी एकत्रित *संयुक्त शाळा अनुदान*  मिळणार आहे.

काय आहेत निकष?
1)0ते 100 पटसंख्या-10,000रू
2)101 ते250पटसंख्या-15,000रु
3)251 ते 1000 पटसंख्या-20,000रु
4)1000 पेक्षाही जास्त पटसंख्या-25,000रु

संयुक्त शाळा अनुदान कोणत्या बाबी साठी खर्च करता येईल?

-क्रीडा साहित्य ,प्रयोगशाळा साहित्य ,आवश्यक भौतिक साधने खरेदी व दुरुस्तीसाठी

-इमारत देखभाल, शौचालय दुरुस्ती आणि इतर भौतिक सुविधा सुस्थितीत ठेवणे याकरिता

-स्वच्छता अभियान  साठी आवश्यक वस्तू खरेदी
जसे फिनाईल, साबण, डांबर गोळ्या ,झाडू ,कचरा कुंडी,ब्लिचिंग पावडर आदी ची खरेदी करिता

-एकूण निधीच्या 10%रक्कम स्वच्छता कार्य योजना वर खर्च करण्यात यावा
  शाळेने स्वछतेसाठी एक action plan बनवायचा असून त्यामध्ये नियोजन केल्याप्रमाणे खर्च करायचा आहे.

-वर्ग अध्यापना करीता शैक्षणिक साहित्य  निर्मितीसाठी अनुदान विनियोग करता येईल

-शाळेचे विद्युत देयक ,इंटरनेट,पाण्याची सोय आदी बाबीवर च खर्च करता येईल.

-शाळेत बालस्नेही वातावरण  निर्मिती च्या आवश्यक बाबीसाठी  खर्च करता येईल

-एकंदरीत शाळासंयुक्त अनुदान शाळेच्या प्रत्यक्ष आवश्यक गरजा लक्षात घेऊन,  व्यवस्थापन समिती च्या मान्यतेने सर्व बाबीसाठी खर्च करता येईल.

केवळ महितीस्तव ,,,

मला आवडलेला लेख

_डॉ. अल्बर्ट एलिस ._
_अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ._
_यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल ._
_विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती_ 
_(rational emotive behaviour thearapy )_
_हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध ._     
     _भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला ._
      _त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत ._

_१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो ._

_२) माणसाला वाटणारी भीती ही  कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते , परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते . पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक असते ._

_३)निराशा येणे ही  मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये  स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश  हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी  यश असू शकते . त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका ._

_४) जग काय म्हणेल हा विचार खोटा  आहे . प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता ._

_५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे . स्वतःचे अस्तित्व , आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही . दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा ._

_६) स्वतःला स्वीकारा . तुम्ही जसे आहात तसे . आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका  . कारण आयुष्य अजून संपलेले नाही .  दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता . कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा . जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल ._

_७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा . दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका ._

_८) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा  पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते ._

_९)दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे  फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच  अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा ._

_१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र  बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ  आहे . कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात . एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही ._

_११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही  व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगता. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते ._

_वरील सर्व हे नियम कालाबाधित आहेत . म्हणूनच या थोर मानसोपचार तज्ञाला आदराने प्रणाम !_

_मनुष्य स्वभाव गुणधर्म, व जीवनातील पुढील वाटचाल करतांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्या बाबत परखड विचार अधोरेखित करणारा लेख !!_
_खूप छान विचारसरणी !!!_

रविवार, २२ जुलै, २०१८

RTSE-2019

.    💎 *RTSE 2019* 💎       
        *तुमच्या पाल्यातील*
*TALENT शोधणारी परीक्षा*
*┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*

_*"Quality is never an accident. It is always the result of intelligent effort."*_  ✨

जिल्हा परिषद व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाची ओळख व आवड निर्माण व्हावी या हेतुने सुरु केलेला एक अभिनव उपक्रम
➖➖➖➖➖➖➖➖
*RTS Exam ची खास वैशिष्ट्ये :*
➖➖➖➖➖➖➖➖
1⃣MPSC व UPSC च्या धर्तीवर  *इ.२ री ते  ९ वी* पर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठी आयोजित केली  जाणारी  एकमेव स्पर्धा परीक्षा
2⃣OMR मशीनद्वारे उत्तर पत्रिकांची तपासणी
3⃣राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा
3⃣परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी
4⃣सर्व सहभागी विद्यार्थ्यांना Merit Certificate
5⃣राज्य व जिल्हा टॉपर्सना शिष्यवृत्ती व मेडल
6⃣ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी यासाठीचा अभिनव उपक्रम
7⃣इयत्तानुसार क्रमिक पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
🗓
➤ *परीक्षा दिनांक: 10 फेब्रुवारी 2019*
➤ *आवेदन करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2018*

➤  RTS 2019 परीक्षा फॉर्म, माहितीपत्रक व इतर सविस्तर माहिती
👇🏽
https://goo.gl/sSSxyJ
➖➖➖➖➖➖➖➖
*Online form  भरण्याची व्यवस्था*
👇

*आँनलाईन फाँर्म  भरण्यासाठी येथे क्लिक करा*
👇🏻
http://rtsexam.com/order-online

*सुचना*
*आँनलाईन फाँर्म भरतांना विद्यार्थ्याच्या शाळेचे नाव SCHOOL NAME LIST मध्ये दिसत नसेल तर आपल्या शाळेचे पुर्ण नाव,पुर्ण पत्ता  8421971929 ह्या मोबाईल वर SMS करुनषपाठवा लगेच सदरील शाळा साँफ्टवेअर मध्ये अपडेट केली जाईल व आपणांस नंतर आँनलाईन परीक्षा फाँर्म भरता येईल*

➤ *परीक्षेचे स्वरूप:*
बुद्धिमत्ता चाचणी 20%
चालू घडामोडी व सा.ज्ञान 10%
अंकगणित 15%
विज्ञान 12%
इतिहास भूगोल 20%
इंग्रजी व्याकरण 8%
मराठी व्याकरण 7%
नागरीकशास्त्र 3%

➤  *2014 ते 2018 या वर्षांच्या इयत्तानिहाय प्रश्नपत्रिका उपलब्ध* दिलेल्या लिंकवर क्लिक करुन pdf  स्वरुपात डाउनलोड करू शकता .
http://rtsexam.com/student-help/

➤ *सर्व काही एका क्लिक वर*
➤ https://goo.gl/sSSxyJ

1.RTS 2019 परीक्षा फॉर्म व माहितीपत्रक (Broucher)
2.Apply Online- भरा ऑनलाईन फॉर्म
3.2018 चे राज्यस्तरीय Toppers व निकाल
4.RTSE catalog पुस्तिका
मागील वर्षाचा निकाल व गुणवंतांची माहिती

📡
*RTS परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ*
www.rtsexam.com
*कार्यालय संपर्क:*
☎ 02482-224156
*Helpline :*
8421971929, 9890014417
➖➖➖➖➖➖➖➖
*भोकरदन तालुका*
     CO-ORDINATOR
        *श्री. गाढे सर*
➖➖➖➖➖➖➖➖
*मो. 8275387323*

*महत्वाची सुचना*
*आम्ही आपणांस  शालेय स्तरावरील  विविध स्पर्धा परिक्षांची माहिती व्हावी साठी  या  उद्देशाने आपल्या साठी WhatsApp वर प्रत्येक  जिल्ह्यासाठी एक वेगळा  ग्रुप केला आहे. त्या साठी आपण आपल्या जिल्ह्यातील ल ग्रुपला Join व्हावे हि नम्र विनंती._*

_*ग्रुप वर मेसेज सेंड करण्याचे अधिकार फक्त Admin ला असेल.*_
*ग्रुप वर उपलब्ध असलेल्या सुविधा*
*RTS Exam माहिती*
*प्रवेशपत्र*
*निकाल*
*ताज्या घडामोडी*
*विविध परीक्षा प्रश्न पत्रिका*
*Ans Key*
*आपला जिल्हा आपली बातमी*
*या सारख्या विविध सेवा.*
*ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपल्या जालना जिल्ह्यातील ह्या  ग्रुपला Join व्हावे हि नम्र विनंती.*

*ग्रुपला अँड होण्यासाठी खालिल लिंकला क्लिक करा*
👇🏻

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/3vgmIV4jmCb1NCVPY7duRy

शनिवार, १९ मे, २०१८

सेवापुस्तिकेतील गटविमा नोंदी....

सर्व सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी एक त्रुटी म्हणजे  गटविमा नोंदी.

गटविम्याच्या नोंदी मधे खालील प्रकारच्या त्रुटी आढळुन येतात...

१. गटविमा नोंद करतांना ज्या वेतन बिलात गटविमा वर्गणी कपात झाली त्या व्हाँवचर नंबर ची नोंद नसणे .

२.गटविमा नोंदीत खाडाखोड असणे.

३. शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी गटविमा वर्गणित झालेल्या बदलानुसार सुधारित नोंदी नसणे.

४. एखाद्या कर्मचा-याची पदोन्नती झाली असेल तर वेतनश्रेणीच्या अनुषंगाने गटविमा वर्गणी कपात नसणे.

५.सुधारित वर्गणी कपात उशिरा सुरु करण्यात आली असेल तर त्या वर्गणीच्या फरकाची नोंद नसणे.

६.गटविमा नोंदिवर गशिअ/ मुअ यांची स्वाक्षरी नसणे.

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे सेवानिव्रुत्ती नंतर गटविमा रक्कम परतावा परत घेतांना   वर्गणी कपात होवुन ही योग्य ती नोंद नसेल तर वर्गणीची रक्कम व्याजासह भरावी लागते.
त्या शिवाय आपल्याला आपली जमा असलेली गटविमा परताव्याची रक्कम जिल्हा परिषद देत नाही.

त्यामुळे कर्मचा-याने आपल्या गटविम्याच्या   नोंदी अद्यावयत आहे की नाही याची खात्री करावी.

रविवार, १३ मे, २०१८

जिल्हांतर्गत बदली अपडेट....

जिल्हांतर्गत बदलीबाबत...

मुख्याध्यापक लॉगीनला "Displaced TUC Transfer Application" ही टॅब येणार आहे.ह्या टॅबला ओपन केल्यावर शाळेतील सहशिक्षक,विषयशिक्षक व मुख्याध्यापक पद निवडल्यानंतर दोन प्रकारचे मेसेज येत आहेत.

१)Err... This Designation Data cannot be Available For Category 5....
असा मेसेज आला तर संबंधित शाळेतील शिक्षकांची बदली झाली नसेल किंवा त्यांनी दिलेल्या २० पर्यायांपैकी एक शाळा मिळाली आहे.

उदा.१)शाळेतील शिक्षकांनी प्रशासकीय प्रकारातून फॉर्म भरला असेल तर त्यांना खो मिळाला नसेल किंवा खो मिळून २० पर्यायांपैकी एक शाळा मिळाली आहे.
२)शाळेतील शिक्षकांनी विनंती प्रकारातून फॉर्म भरला असेल तर त्यांना २० पर्यायांपैकी एक शाळा मिळाली असेल किंवा २० शाळांपैकी एकही शाळा मिळाली नसल्याने त्यांची बदली झाली नाही.ते आहे त्या शाळेवरच राहतील.

२) शाळेतील शिक्षकांची नावे यादीत दिसत असतील तर...
या शिक्षकांना प्रशासकीय कारणाने खो बसलेला आहे परंतु दिलेल्या 20 शाळेपैकी एकही शाळा उपलब्ध नसल्यामुळे एकही शाळा मिळालेली नाही...

या यादीतील शिक्षकांनी २० पर्याय नव्याने नोंदविणे आवश्यक आहे.

यावेळी प्रशासकीय किंवा विनंती प्रकारातून फॉर्म भरला असेल तरीही खो बसल्याने बदली होत आहे आणि दिलेल्या २० पर्यायांपैकी शाळा मिळाली नाही.

केवळ माहीतीस्तव.....

बुधवार, ९ मे, २०१८

संत तुकारामांचा एक अभंग....

संत तुकोबांचा उपदेश

ऐसें संत जाले कळी ।
तोंडीं तमाखूची नळी ।।१।।
स्नानसंध्या बुडविली ।
पुढें भांग वोडवली ।।ध्रु.।।
भांगभुर्का हें साधन ।*
पची पडे मद्यपान ।।२।।
तुका म्हणे अवघे सोंग ।
तेथें कैचा पांडुरंग? ।।३।।

अर्थ व चिंतन -
अभंगाचं चिंतन वाचताना कुंभमेळ्यातले साधू डोळ्यासमोर आणून वाचा. तुकोबांच्याही काळात कुंभमेळे झालेत. त्यांना त्यात चाललेला व्यसनांचा बाजार मान्य नव्हता. कुंभमेळ्यात पांडुरंग असूच शकत नाही, ही त्याची ठाम भूमिका होती. आता इथं पांडुरंग का नाही? तर, इथं वारकरी भक्त नाही, म्हणून.

कुंभमेळ्यातले साधू तर निव्वळ व्यसनी आहेत. एक नव्हे तर अनेक प्रकारच्या मादक पदार्थांचा इथं राजरोस वापर होताना तुकोबांनी पहिला. इतरही अनेकांनी हे पाहिलं, पण ते तोंड बंद ठेवून होते. तुकोबांनी या विषयाला व्यापक स्वरूप दिलं. तुकोबा बोलले म्हणून ते खास ठरतात.

पुढच्या पिढ्यांवर पश्चातापाची वेळ, वाईट लोक 'अनेक' असतात म्हणून येत नसते, तर चांगले लोक  'शांत' बसतात, म्हणून येत असते. अशावेळी 'बोलणारे' तुकोबा समाजातील सन्माननीय व्यक्ती ठरतात.

या व्यसनी साधूंबद्दल बोलताना तुकोबा म्हणतात, "या कलियुगात असे काही संत झालेत की ज्यांच्या तोंडात तांबाकूने भरलेली चिलीम असते."

अनेक दिवस अंघोळीचा पत्ता नाही. "स्नानसंध्या तर बुडवलीच पण (चोवीस तास नशेत राहण्यासाठी) आपल्या पुढं भांग वाढून ठेवतात." आणि ती पीत राहतात, पीत राहतात.

लोकांच्या भक्तीची काही साधने असतात. नामस्मरण, चिंतन इत्यादी. पण या साधूंचं "भांग पिणे आणि चरस वगैरे सारख्या पदार्थाची भुकटी ओढणे, ही साधने आहेत. आणि (दारू तर कितीही प्या, चढतंच नाही.) दारू पिणे हे तर जणू यांच्या पचनी पडलेलं आहे."

म्हणून तुकोबा शेवटी म्हणतात, "हे सगळं निव्वळ सोंग आहे. आणि अशा सोंगाच्या ठिकाणी पांडुरंग कसा बरं असेल?"

तुकोबा म्हणतात, कुंभमेळ्यात पांडुरंग नाही. अहो, पांडुरंग तर पंढरपूरला. मग अशावेळी साहजिकच प्रश्न पडतो, वारकऱ्यांचं कुंभमेळ्यात काय काम?

शुक्रवार, ४ मे, २०१८

महागाई भत्त्याचे दर.....

महागाई भत्ते.....
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर
करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात 2006 पासून सुधारणा with date D.A.***********
1) 1.1.2006. Nil
2) 1.7.2006 2%
3) 1.1.2007. 6%
4) 1.7.2007. 9%
5) 1.1.2008. 12%
6) 1.7.2008. 16%
7) 1.1.2009. 22%
8) 1.7.2009. 27%
9) 1.6.2010. 35%
10) 1.11.2010. 45%
11) 1.5.2011. 51%
12) 1.10.2011. 58%
14) 1.1.2012. 65%
15) 1.7.2013. 72%
16) 1.1.2013. 80%
17) 1.7.2013. 90%
18) 1.5.2014.100%
19) 1.7.2014 107%(feb-15)
20) 1.1.2015 113% (Oct-2015)
21) 1.7.2015  119% (feb-16,)
22) 1.1.2016 - 125%
23) 1.7.2016 - 132%
24)  1.7.2017_136%

सेवापुस्तक अद्यावत करताना....

सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.

👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
👉३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
👉४. जात पडताळणी बाबतची नोंद.
👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
👉११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
👉१५. नाव बदलाची नोंद.
👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
👉१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
👉१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
👉२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
👉२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
👉२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
👉२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
👉२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
👉२५. रजा प्रवास सवलत नोंद.
👉२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
👉२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
👉२८. सेवा पडताळणीची नोंद.
👉२९. जनगणना रजा नोंद.
👉३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
👉३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद.

गुरुवार, ३ मे, २०१८

संत तुकाराम यांचा अभंग

संत तुकोबांचा उपदेश

गाजराची पुंगी ।
तैसे नवे झाले जोगी ।।१।।
काय करोनि पठन? ।
केली अहंता जतन ।।ध्रु.।।
अल्प असे ज्ञान ।
अंगीं ताठा अभिमान ।।२।।
तुका म्हणे लंड ।
त्याचें हणोनि फोडा तोंड ।।३।।

अर्थ व चिंतन -
लहान मुलं वाजवण्यासाठी गाजराची पुंगी बनवतात. ती वाजते तोवर वाजवतात आणि काम संपलं की खाऊन टाकतात. तुकोबा म्हणतात, "गाजराच्या पुंग्या बनतात तसे नवनवीन जोगी, साधू लोक तयार तयार झाले आहेत." असं पोटासाठीं बाह्यवेशाने जोगी बनलेल्या लबाड आणि दांभिक लोकांबद्दल तुकोबा राग व्यक्त करत आहेत.

ते पुढे म्हणतात, "अहो यांनी धर्मग्रंथांचं पाठांतर करून तरी काय केलं हो? अहंकार तर अंगात जशाला तसाच राहिला." ग्रंथ नुसतेच पाठ करणाऱ्यांना फार तर 'पाठक' म्हणता येईल. पाठांतर करणाऱ्याला ज्ञानी कसं म्हणता येईल? वाचलेल्या अक्षर-न-अक्षराचा अर्थ कळला आणि त्यानुसार वागणं घडलं तर त्याला ज्ञानी म्हणता येईल. पण या गाजराच्या पुंग्यासारखे पोटभरू तयार झालेले हे साधू म्हणजे लबाड म्हटले पाहिजे.

वाचन भरपूर आहे, पाठांतर बरचसं आहे पण सोबतच अहंकारालाही जपलं आहे, तर मग तो साधू लबाड समजावा.

नुसतंच वाचन आणि पाठांतराने ज्ञान मिळत नसतं. त्याला आकलन आणि अनुभव दोन्ही पाहिजे. पण हे गाजराच्या पुंगीसारखे तयार झालेले लोक "ज्ञानानं तर कमीच असतात, उलट यांच्या अंगात (वाचन आणि पाठांतर केल्याचा) ताठर अहंकार मात्र भरपूर असतो."

आणि म्हणून शेवटी तुकोबा म्हणतात, "अकलेनं पोकळ आणि अहंकाराने भरलेले हे जोगी, साधू लोक म्हणजे निव्वळ लबाड माणसं आहेत. म्हणून यांचं तोंड फटके हाणून फोडलं पाहिजे."

वारकरी संतांनी सांगितलेल्या लबाड साधूंच्या या खुणा आपण नीट समजून घेतल्या नाहीत. ज्यांना समजल्या त्यातल्या काहींना सोडलं तर बाकीच्यांना त्या समाजाला समजून सांगता आल्या नाही. म्हणून तर हे ढोंगी साधू लोक आपल्याला भेटतच राहतात. एक कारागृहात गेला की दुसरा मठ तयार करून तयारच असतो. दुसरा गेला की तिसरा आणि तिसरा गेला की चौथा. हे सगळं आपण आजही आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. रोज कुणी-ना-कुणी नवीन बाबा तयार झालेला वाचायला किंवा ऐकायला तर मिळेलच.

  

Latest Article

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.

दिपावली सण: अंधारावर प्रकाशाचा विजय.      दिपावली, ज्याला दिवाळी म्हणूनही ओळखले जाते, हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा आणि महत्वाच...

वाचकांचा पसंतीक्रम.